Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
(लेखांक १ )
पुरंधर्यांची स्मरणाची यादी
श्री
यादी स्मरणाच्या रुमालांत स्मरणाच्या तबलखा
२ सन ११४४
१ सन ११४५
१ सन ११४६
---------------
१ ही स्मरणाची याद सासवडांतील श्रीमंत नानासाहेब पुरंधरे यांच्या दफ्तरखान्यांतील आहे. हींत एकंदर २१२ बंद आहेत. प्रत्येक बंद सुमारे ४ इंच रुंद व १५ इंच लांब आहे. बहुतेक बंद जुनरी खर्ची असून गवती रंगाचे आहेत. याद प्रायः पाठपोट लिहिलेली आहे.
हें स्मरण अंबाजी त्र्यंबक व नाना पुरंधरे यांनी लिहिले आहे. स्मरणाचे एका सबंद वर्षाचे कागद एका किंवा दोन तबलखांत घालून ठेवीत. लांब कागदाच्या घड्या घालून बनविलेल्या पट्टयास तबलख ह्मणतात.
ह्या तबलखा पुरंधर्यांच्या मूळ दफ्तरांत किती होत्या त्याचा तपशील येथे दिला आहे. सन ११४४ फसलीपासून ११५२ फसलीपर्यंतच्या ९ वर्षांच्या व सन ११६० पासून ११६७ पर्यंतच्या ७ वर्षांच्या तबलखा मूळ रुमालांत होत्या. सन ११५३ पासून ११५९ पर्यंतच्या व सन ११६६ सालची तबलख ह्या मूळ रुमालांत नव्हती. ज्या अर्थी ११६७ हें या तपशीलांतील शेवटलें साल आहे त्याअर्थी हा तपशील ह्या सालाच्या शेवटीं लिहिला असें अनुमान निघतें.
१ सन ११४७
१ सन ११४९
१ सन ११४९
१ सन ११५०
१ सन ११५१
१ सन ११५२
१ सन ११६०
१ सन ११६१
१ सन ११६२
१ सन ११६३
------------------
पुरंधर्यांच्या स्मरणाच्या रुमालांत ह्या १६ तबलखांखेरीज, शके १५४० पासून शके १५९६ पर्यंतच्या ह्मणजे थोरले शिवाजी महाराज छत्रपति यांच्या ५६ वर्षांच्या तबलखी होत्या. ह्मणजे शहाजी व शिवाजी यांच्या कारकीर्दीतील प्रत्येक वर्षांच्या ठळक ठळक गोष्टींचे टिपण ह्यांत होतें.
ह्याशिवाय अवरंगजेब अवरंगाबादेस आल्याचा वाकाहि या रुमालांत होता.
तसेंच, राजश्रीच्या ह्मणजे शाहूमहाराजाच्या कारकीर्दीतील दरवर्षाचे वाके जोशी यांनी लिहिलेले या रुमालांत एका ठिकाणी जमवून ठेविले होते असें शेवटल्या कलमावरून दिसते. हे जोशी शाहूमहाराजाबरोबर अवरंगजेबाचे लष्करांत होते व ह्यांनी आपल्या वाक्यांत दरसालच्या ठळक ठळक गोष्टींचे टिपण करून ठेविले होते.
येणेंप्रमाणे सन ११६७ फसलीच्या शेवटी पुरंधर्यांच्या स्मरणाच्या रुमालांत शके १५४० ह्मणजे इ. स. १६१८ पासून सन ११६७ फसली ह्मणजे इ. स. १७५७ पर्यंतच्या वार्षिक ठळक ठळक गोष्टींची टिपणें होतीं. पैकी मी इ. स. १९०१ सालांत श्रीमंत नानासाहेब पुरंधर्यांचे दफ्तर तपासण्यास प्रथम गेलों तेव्हां तेथें सध्यां छापलीं जाणारीं स्मरणें तेवढीं मिळालीं. बाकीचीं स्मरणें पुरंधर्यांच्या दफ्तरांत सध्या असतील किंवा नसतील हें निश्चयानें कांहींच सांगतां येत नाहीं. कारण श्रीमंत नानासाहेब पुरंधरे यांच्या जुन्या दफ्तरांतील कागदांची त्यांच्या दफ्तरखान्यांत निव्वळ पखळण झालेली आहे व लाखो कागद सदींनें कुजून जात आहेत. ह्या कागदांची व्यवस्था करण्यास व त्यांतून निवड करण्यास श्रीमंतांनीं एखादा आधुनिक शिकलेला व मेहनती पदवीधर लावावा ह्मणजे कागद लावण्याचें काम बहुशः बरें होईल.
पत्रें यादी वगैरे.
१ सन ११६४
१ सन ११६५
१ सन ११६७
१ कित्ता तबलख शके १९४० ता शके १५९६
१ हकीकत बयानवाके अलमगीर दिल्हीहून अवरंगाबाजेस आले.
१ शेक सखैअर याचे.
१ जोशी यांचेथील वाका राजश्रीच्या राज्यांतील.