Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

श्री शके १६७३ कार्तिक वद्य १४

पो। छ १०
माहे मोहरम

तीर्थरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी.

आपत्यें पुरुषोत्तमाने कृतानेक सा। नमस्कार विनंति. येथील क्षेम ता। छ २७ जिल्हेज वडिलांचे आशीर्वादें करून यथास्थित असे. विशेष. येथील साद्यंत वृत्त पेशजी सरकारचे जाबी जोडीबा।र लेहून पाठविलें आहे, त्याजवरून विदित जालें असेल. सांप्रतचें वर्तमान तरी, खानखानाचे व बक्षीचे दुईमुळें उभयतांनीं परस्परें सफदरजंगासी सख्याचा पैगाम केला. त्याजला तों याजमध्यें हरकैसें फूट पाडणेंच होतें. यास्तव, खानखानांनी जें पत्र शुक्यासहवर्तमान पाठविलें, तें सफदरजंगानें बकशीस दाखविल्यावरी बकमीनें नजीबखान रोहिल्याचे हातें सलुका करून पातशाहास अर्जी केली कीं, सफदरजंगाची तकसीर माफ करणें, त्याजवरून पातशाहा बहूत दिलगीर जाले. खानखानानें बकसीस मारावयाची तदबीर केली ; यास्तव, बकशीनेंच त्यांची पैरवीं केली. कैसी ह्मटल्यास, आपण खुद्द विजारत घ्यावी. सफदरजंगाचे लेंकास बकशीगिरी, व सफदरजंगास मुतालक, वकालत, व अयुधेचा सुभा देऊन सुबे मजकुरी रवाना करावें, ऐसा रोहिलियांनी व बकसींनी जाटासी व सफदरजंगासी इत्यर्थ ठरविला. आणि अर्जी केली. त्या अर्जीचा जाब काय देतील ते पाहावे. मुख्य भयभीत होऊन बक्षी सफदरजंगासी एक जाले. अतःपर पातशाहाचे मातुश्रीस किल्याबाहेर ठेवणार ; व खानखानाजीची पुजा करणार, हा इत्यर्थ जाला आहे. पातशाहाची मर्जी सफदरजंगासी सलुक न कराक्याचे पल्यावरी पूर्वी आणिली असतां आह्मी या कामांत कैसे पडावें ? ह्मणून श्रीमंताचे आज्ञेप्रमाणें या कामांत न पडलों. बकसीसी व सफदरजंगासी आपले हातें सलुक न केला. कां कीं, रोहिले, बकशी, जाट, सफदरजंग, एक जाल्यावरी आपणासही मोठे बल याजला तोडावयास लागेल. यास्तव बक्षीपासोन षफथ घेतली की, श्रीमंत स्वामी व सरदार येथें आलियावर त्यांचे मर्जीसिवाय मी वागणार नाहीं. ते ह्मणतील तें करीन. परंतु आतां दुषमनाचे हातें वाचवावयाची फिकीर जसतसी करून, ते येत तोंवरता मकदूर मजहला पाडितों. हा कौलकरार घेऊन आह्मी पुनरोक्त दिल्लीस पातशाहासमीप आलो. मजहलियांत मजहला मोठाच पाडला. रोहिलियाची तलब पातशाहा न देत. यास्तव बकशीनें दिल्लीपासून कोळेपरयंत तमाम महाल त्याचे तलबेंत लिहून दिल्हे. यास्तव पातशाहा माधोसिंगाची व खानखानाची मिनत अतीशय करितात की, उभयतां मिळोन, सफदरजंगास, जाटास व रोहिलियासी, व बकशीसी, मारावें. ऐसियामी, ऐसा रोहिलियाचा मारा ! माधोसिंगजी व खानखानाजी आहेत, मग यांचेपुढे कोठून बाजी पेष होईल ? ईश्वरेच्छा काय आहे हे कळत नाही. जें होईल ते सो। लेहूं. कोण्ही कांहीं रयायत करील ऐसें नाहीं ? काम होय तोंवर कोरडी मिनत करितात. मनसब द्यावयासी तयार. जागीर कपर्दिकेची न देत. ऐसी कृपणसेना मिळाली आहे. तें, व घरची अवस्था कोठवर लिहावी ? श्री व वडिलाचे पुण्य लज्या रक्षीणार समर्थ आहे ! श्रीमंत स्वामीस व सरदारांस पत्रे मोघम लेहून वडिलांचे पत्रावर हवाला घातला आहे. श्रीमंतांस निवेदन करावे पूर्वी लिहिल्याप्रमाणें माझे नांवें फौजेचे नेमणुकेची सनद घेऊन, थोडी बहुत तर्ही फौज घेऊन पुढें वडिलीं सत्वर श्रीमंताची आज्ञा घेऊन यावेंकी कित्येक कामें होतील. जर फौज अति सत्वर ये प्रांतीं येत तरी उत्तम. नाहीं तरी कवडी मिळणार नाहीं. कां की, जे जागा मिळा-, वयाची, ते खालीं जालियावर कोठून मिळेल ? सत्वर फौज येत, व वडिलांचे पुढे फौज व सनद नेमणुकेची घेऊन अतिसत्वर येणें होय तें केलें पा।. येविसीं हैगै न करितां सत्वर येणार वडील समर्थ आहेत. पुढे जें होईल तें सो। लिहूं. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

चिरंजीव तात्यास आसीर्वाद. सदैव कुशळव्रत लिहीत जाणें. हे आसीर्वाद. राजश्री त्रिंबकपंतास नमस्कार.

समस्तांस नमस्कार अनुकमें आसीर्वाद सांगणे. राजश्री सखारामपंतास व राजश्री गंगोबातात्यास सा। नमस्कार. तुमचे पुत्र सुखरूप आहेत. बहुत काय लिहिणे ?