Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री शके १६७३ भाद्रपद शुद्ध १२
नकल
राजश्री गोविंदराव चिटणीवीस गोसावी यासी :-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य
स्ने॥ दमाजीराव गाइकवाड सेनाखासखेल रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ सवाल पावेतों जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. रावसाहेब आपणाकडून पत्र येत नाही असें नसावें. श्रीमंत छत्रपतीस विनंति करून आमची रवानगी केली. नंतर महाराजांनी मुलास ऐवजाचा तगादा केला. तेव्हां पाहार्यांतून सोडणें कोणाचे वस्तु न जालें. आपण जिमा घेऊन, त्रिवर्ग चिरंजिवास आपले घरीं आणून बारदास्त ठेविली हें. वर्तमान मुलांनी लिहिल्यावरून कळेलें. तो ऐवज येथून पाठविण्यास तजवीज करीत आहों. मागाहून पाठवितों. चिरंजीवाची हुरमत आपण बचाविली. हा उपकार विसरणार नाहीं. आपला धंदा वगैरे बंदोबस्त यादीप्रमाणें मजकडून केल्यांत अंतर होणार नाहीं. आपले चिरंजीवास चिटणीसी दरक पंचवीस हजार नेमणूक सरकारी पागा व कारकुनाचा बंदोबस्त शिवाय एकूण एकावन हजार रुपये पावत जातील. परंतु खासे न आले, तरी पंचवीस हजार रुपये घरीं मिळतील. हरतर्हेनीं पोहोचते करीत जाईन. व पागा व कारकून राहिल्यास शिरस्त्याप्रमाणें पावत जातील. येविसी समक्ष बोललोच आहे व शफत केला. बहुत काय लिहूं. हे विनंति.
मोर्तबसुद्र.
श्री मार्तड
चरणीं तत्पर
पिलाजी सूत द-
माजी गायक
वाड मारतंड
पौ। छ १९ सवाल सन इसन्ने खमसेन. शके ६७१.
सा। १८०६.