Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

श्री शके १६७३ श्रावण वद्य ३

नकल.

राजश्री गोविंदराऊ चिटणवीस गोसावी यांसी.

छ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य

स्नो। दमाजीराऊ गायकवाड सेनाखासखले रामराम विनंति उपरि येथील कुशल ता। छ १७ रमजान पावेतो जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे विशेष. आह्मी आपला निरोप घेऊन आल्यानंतर माहाराजांनी त्रिवर्ग मुलांस वाड्यांत नेऊन ऐवज मागितला. न मिळे तरी धनी देऊन मुदत करून जाणे. नाहीं तरी किल्याखालीं उतरावयाची रजा होणार नाहीं अशी आज्ञा जाहली. तेसमंई कोणी कामदार जिमा न घेत. हे आपण पाहून मुलें स्वाधीन घेऊन घरी आणलीं. बरदास्त फार ठेविली. ह्मणून मुलांनी लिहिल्यावरून कळलें. रावसाहेब मी तुमचा उपकार विसरणार नाहीं व ऐवजही सोईसोईनें पाठवीन. परंतु प्रसंगी माझी अब्रू अपण राखली त्यास मी शपथेप्रमाणें आपले नेमणुकीप्रमाणें चालवीन. यास अंतर करणार नाहीं. फार काय लि॥ बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.

मोर्तब सुद.

श्रीमार्तंड
चरणी तप्तर
पिलाजीसूतद.
माजी गायक
वाड मरतंड.

पो। छ ९ माहे सवाल सन इसन्ने खमसेन.

सन १८०८