Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शाहूराजे यांस अजमशहानीं बराबर नेलें. त्यास, अजमशहास झुलपुकारखानांनीं सल्ला दिल्हा कीं राज्य घेतलें तें जाईल. याजकरितां शाहूराजे आपले ह्मणवून निरोप द्यावा. असें सांगितलें व बेगमही महाराजांवर कृपा करीत होती. ते समयीं माहाराजांस आदरें बहुमान करून माळव्यांतून निरोप दिल्हा. अजमशाहा मजल दरमजल करीत दिल्लीस चालिले. अवरंगजेब दक्षिणेंत असतां त्याजवळ अमीरउमराव व तोफखाना, सलतनत होती. ते अजमशाहाबराबर होतीच व बहादुरशाहा दिल्लीच्या तक्तावर बसोन पातशाहात करूं लागले. तिकडे अमीरउमराव थोर थोर होते ते त्यास सामील झाले. सातआठशें तोफांची तयारी केली व फौज ऐशीं हजार जमा करून दिल्लीबाहेर निघोन आले. त्यास, बहादुरशाहा, अवरंगजेब पातशाहाचा वडील पुत्र, पातशाईस तो योग्य व जमीयत व खजाना त्याच्या स्वाधीन लागले व दिल्ली त्यांणीं आक्रमिली. अजमशाहाबराबर फौज भारीच होती. लढाई मातबर होऊन अजमशाहा मोडिला व ठार पडला. तेव्हां अजमशाहाबराबरचे अमीरउमराव बाहादूरशाहास जाऊन भेटले. श्रीमंत शाहूहाराज माळव्यांतून दरमजल खानदेशांत आले. तेथे चिमणाजी दामोदर व परसोजी भोसले भेटले. त्यांचे विचारें मसलत करून फौज जमा करीत करीत गंगातीरास आले. तेथें आठ पंधरा दिवस मुक्काम करून तेथून कुच करून गंगा उतरून पुढें आले. फौज रोजच्या रोज नवीन ठेवीत दरमजल आले. त्यास, हें वर्तमान ताराबाईस कळलें. तेव्हां त्यांहीं बातमीस पाठविलें. बातमी आणविली. त्यास, शाहूराजे यांचे डोईस केंस होते. जोगडा, गोसावी, तोतया आहे असें राज्यलोभाचे अर्थे बोलून धनाजी जाधवराव यास चाळीस पन्नास हजार फौजेनिशीं शाहूराजे यांजवर पाठविलें तेही दरमजल भीमातीरास खेडास आले. तेथे शाहूराजे यांची व जाधवराव यांची गांठ पडोन युध्दप्रसंग मांडला. जाधवरायाजवळ भारी फौज व महाराजांजवळ थोडकी फौज असतां जाधवराव यास मोडिलें. तेव्हां कित्येकांचीं राजकारणें लागोन महाराजांस भेटले व जाधवरावही घोडयावरून उतरून कुरनीस करून रुजू जाहले. महाराज दरमजल दहीगांवास येऊन,चंदनवंदन किल्ल्याचें राजकारण करून किल्ले सर केले. ते समयीं परशरामपंत यांणीं सातारा किल्ला बळविला. साताऱ्यावर शेखमिरा होते. त्यांणीं परशरामपंतांस कित्येक गोष्टी महाराजांस भेटावयाच्या सांगितल्या असतां त्यांचे विचारास न आले. शेखमीराजवळ पांचसातशें माणूस होतेंच. परंतु परशुरामपंत स्नान करते वेळेस धरले. तेव्हा किल्ल्यावर गडबड होऊन तरवारी झळकूं लागल्या. त्या चंदनवंदनाहून पाहतांच महाराजांनीं स्वारी करून किल्ल्यावर गेले. किल्ला हस्तगत झाल्यावर परशरामपंताचे डोळे काढीत होते. तें वर्तमान खंडो बल्लाळ चिटणीस यांस कळतांच, धाऊन जाऊन सख्त रदबदल करून वांचविले. ते समई पायांत बेडी घातली. त्याजवर कृष्णराव खटावकर, मोगलाई मनसबदार होते, ते फौजसुध्दा सातारियास चालू आले असतां, महाराज फौजसुध्दां त्यांजवर गेले. लढाई होऊं लागली. ते वेळेस परशरामंपत यांनीं आपलें पुत्र श्रीपतराव यांस सांगितलें कीं आज लढाई करून महाराजांची कृपा संपादून माझी बेडी तोडवणें किंवा मरणें. याजवरून श्रीपतराव यांनीं जिवित्वाकडे न पाहतां सफेजंग लढाई करून कृष्णराव खटावकर यास मोडून पस्त केले. संध्याकाळीं महाराज सातारियास येतांच परशरामपंताचे पायांतील बेडी तोडून परम कृपावंत महाराज झाले. बाळाजीपंतनाना धनाजी जाधवराव याजपाशीं बाबतीचा रोजगार करीत होते. जाधवरावाचा व नानाचा पेंच पडिला. याजमुळें अगोदरच नाना महाराजांस येऊन भेटले. महाराज सातारियास शके १६३९ संवत्सरी दाखल जाहले. राज्याचा बंदोबस्त करूं लागले. सरकारकुनांस पदाची वस्त्रें बहुमान यथायोग्यतेनरूप दिल्हीं. पदें येणेंप्रमाणें:-