Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१४] श्री ४ मे १७२९
राजश्री राघोपंत व राजश्री राजीपंत गोसावी यासीं
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजन्य स्ने॥ पिलाजी जाधवराव दंडवत. विनंति येथील कुशल ते॥ छ १२ सवाल१५ १५+ १५++ १५+++ १५++++जाणून स्वकीये कुशल लेखन करणें. यानंतर :- तुह्मी पत्र इंदूरचे मुक्कामीहून चैत्र शुध्द एकादशीचें पाठविलें, तें सुपें वेढा बंगस येथील मुक्कामी छ ९ सवाली पावलें. वर्तमान कळलें. घरचें वर्तमान व महालचें वर्तमान लिहिलें तें कळों आलें. ऐशियास महालावर वराता आहेत. त्यास सरदेशमुखी वगैरे नेमणुकीप्रणें ऐवज ज्याचा त्यास पावणें. अखेर सालीं गवगवा न ठेवणें. आह्मांकडील वर्तमान तरी : - महंदखान बंकस प्रयागचा सुभा छत्रसाल राजस्थान बुंदेलखंड याजवर मसलत करून चालोन आला होता. त्यास आह्मी व ते एकत्र होऊन बंगसास वेढा घालून बसलों होतों. इतकियांत बंगसाचा लेक कायेमखा तीस हजार फौजेनिशी छ ९ रोजी आह्मावर चालोन आला. त्याशी आह्माशी लढाई झाली. ईश्वर इच्छेनें फौजेनिशीं हा बुडविला. तीन हजार घोडे घेतले, व १३ हत्ती पाडाव केले. आपल्या पागेस ८ हत्ती आले, व एक पील व १०० घोडे व १७ उंट याशिवाय लष्करांत शेदोनशे घोडे व ५०-६० उंट आले. आप्पाजी माणकेश्वर यांकडे २ हत्ती आले व दावळजी सोमवंशी सरलश्कर यांजकडे २ हत्ती आले. वरकड आमच्या लश्करांतील सुखरूप आहेत. झुंजांत ठार झाले त्यांची यादी लिहिली आहे. त्याप्रणें ज्याच्या त्याच्या घरी वर्तमान पावतें करणें. आह्मीही मजल दरमजल येतो. बहुत काय. हे विनंति. राजश्री पंत प्रधान याचीं पत्रें, राजश्री बाळाजीपंतास लखोटा आहे, तो त्यास पावता करणें. हे विनंति.