Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

शके १६१० त संभाजीचा पराभव झाला. तेव्हांपासून चेंऊल प्रांतीं पातशाही अंमलाची पैवस्ती जाली. राजकोट, सागरगड व अमिनाबाद ऊर्फ पाली या किल्ल्यांजवळ पातशाही अमलाची पैवस्ती जाली. कुलाबा, खांदेरी व उंदेरी किल्ल्यांवर महाराज छत्रपति तर्फेचे अंमलदार होते. माणकोजी सूर्यवंशी, सुभानजी खराडे व उदाजी पडवळ प्रबळगडास गेले. भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे कुलाबा, खांदेरी येथेंच राहिले. पातशहाच्या व महाराजांच्या तर्फेनें कलह होऊन दुतर्फा जमाबंदी होत असे. सुदामती चालत नसे. पातशहाकडून प्रांताची कमावीस व्हावयाकरितां मुलाणा हुसेन सेकिन दिवट प्रगणे यशवी उपनांव हासवारण वाईथ त्याचा बेटा शेख महंमद यास अंमलदारी होऊन, हुजरून मामतमतखान दिवाण असें पद देऊन चेंऊल सुभेयाची कमावीस करण्यास शके १६११ चे सालीं पाठविला. राजकोट, सागरगड व अमिनाबाद ऊर्फ पाली तीन किल्ले पातशाही व कुलाबा खांदेरी येथे भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे, असे असतां ममतमतखान दिवाण याची व उभयतांची लढाई जाली. शके १६१३ चे सालीं एकमेकांचे शिपाई फिरूं देत नसत. तेसमयीं तहनामा जाला. निमेनिम प्रांत वाटणी जाली. किल्ले उंदेरी याकुतखान याजकडे जमा नवती. चोरून मुलूख मारून होता. मामतमतखान दिवाण याचा अंमल शके १६११ पासून शके १६३० पर्यंत. याचे पुत्र दोन :- १ तानुद्दीन अल्लीखान, २ सरफरद्दीखान वाकनवीस. सदफरदीखान वाकनवीस याचा अंमल शके १६३१ पासून १६४० पर्यंत. तानुद्दीन अल्लीखान याचा अंमल १६४१ पासून १६४७ पर्यंत. यास पुत्र गाजीखान ह्मणून एकच होता. गाजीखान साहेब याचा अंमल शके १६४८ पासून शके १६५३ पर्यंत. हे चेंऊल सुभे, किल्ले सागरगड, राजकोट, अमिनाबाद येथें अंमल करीत असत. कुलाबा खांदेरी येथें भिवजी गुर्जर व कन्होजी आंग्रे.