Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

बाकी रुपये 433 2 सरकारांत दाखल. हिशेब वडिलांस कळावा ह्मणून लिहिला असे. अर्धे भादव्यापासून नवें साल लागलें. पानास निरख पांच पावणेपांच साडेचार उत्तम मालाचा आहे. नीरस माल तीन साडेतीन असा आहे. खुडतात. निळव्याचीं ठिकीं थोडीं बहुत आहेत. ते विकरी लागली आहे. गिराईक उदमी तों कोणी नाहीं. येवनाचे सरकारांत हातींस घेतात. पैका देतात. खोट नाहीं. सेवटीं पाहावें. प्रस्तुतकाळीं कोणाचा उपद्रव जाजती नाहीं. सुरळीत चालतें. घरकर्त्याचे संसारिकाचे आपले आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक करितों. राजश्री भिकाजीपंत मामाकडील हा काळपावेतों कराराप्रमाणें ऐवज येतो. सोळाशें रुपये गोविंदपंत परगणांपैकीं घालून बसला आहे. प्रस्तुत तो येथें नाहीं. वऱ्हाडांत आहे. यानंतर वे॥ शिवभट साठे बंगालीयास गेले. काशीस येतील. गांठ पडली तर सात आठ शत रुपये त्यांजकडे आपला ऐवज आहे. व राजश्री बापूजीपंतांचे रुपये ६५ इतके उगऊन घ्यावे. यानंतर शिवभट साठे यांची स्त्री शांत जाली. त्यांची मातुश्री कालच वऱ्हाडांतून आली. राजश्री रघोजी भोसले यांनीं आह्मांस पागोटें व शेला असा पाठविला आहे. कळलें पाहिजे. यानंतर भाद्रपद शुध्द द्वितीयेस वेदमूर्ति दीक्षित व नारायण जोशी व भिकाजी नाईक स्वार होऊन पुण्यास गेले. तेथें पावलियाचें पत्र आलें होतें. भेटी होऊन बोलीचें वर्तमान आलें नाहीं. राजश्री राजी केशवही तेथें गेले आहेत. त्यांचे मामलतीचे साहित्येविषयीं उभयतांस सांगितलें आहे. काय होऊन येईल तें लेहून पाठवूं. जालनापूरची मामलत शामजीपंत टकले यांजकडेच राहिली. अद्याप कोणी नवे जुने जाले नाहींत. वऱ्हाडांतील सरदेशमुखी हरी दामोदर यांणीं केली ह्मणून वर्तमान आहे, वऱ्हाडचा सुभा मुरादखान जाला. दिवाणगिरी मजलीसरायांनीं केली. आठा लक्षांचा ईजारा केला आहे. अद्याप गेले नाहींत. जाणार. कळावें ह्मणून लिहिलें असे. शहरांत अवघें सभ्य माणूस मातबरींत नसीरजंग आहे. वडिलासीं इतका स्नेह; परंतु आपले येपाणी नहर येत होता. त्यास रामदासपंतानें ज्यांस ज्यांस पाणी दिल्हें होतें, त्याचे अवघे नहर फोडिले. त्याजबराबर हाही फोडिला. दोन चार वेळ सांगविलें, व आह्मीं एक वेळ भेटीस गेलों, तेव्हां समक्ष हटकिलें. उगाच राहिला. आज्ञा देतों. नाहीं देत हें कांहीं न बोले. परोक्ष शामराय विसाजी यांजपाशीं बोलिला कीं, दीक्षितांचें मज बहुत अगत्य. मजला परंतु दर्गाहकुलीखान, शाहानवाजखान यांचेही नहर फोडिली. त्यांची परवाणगी जाली नाहीं. याची परवाणगी दिल्यास बरें दिसत नाहीं, असें शामराय सांगत होते.