Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मोठमोठयांचीं घरें फोडतात. दरवडे पडतात. कांहीं नीत राहिली नाहीं. शहरांत असा उपद्रव कधीं ऐकला नव्हता. कालच कुसाजी गोविंद याची भिंत फोडली. दोन दोन भाले उंच शिडया आणून लाविल्या. माडीवर भोंक पाडिलें. इतक्यांत जागे जाले. गलबला होतांच पळाले. शिडया तशाच राहिल्या. शासन नाहीं. साताऱ्यांतही गलबला फार आहे. आह्मीं आपलेकडून सावधता बहुत करितों. चार प्यादे, दोन महार व आणखी गांवचे जागले, अशी गस्त दोन वेळ रात्रीस देववीत असतो. आपले हवेलींत, मागें जागला आहे व पुढें वेसकर एक व माडीवर पाळीप्रमाणें जागावें, असा नियम केला आहे. वडिलांचें पुण्य समर्थ आहे. कांहीं चिंता नाहीं. यंदां पावसानें अतिशय केला. गांवकुसूं चहोंकडे पडिलें. उपाय नाहीं. दसरा जालियावर गांवकुसासही काम लावूं. शहरांतही भिंती व घरें असंख्य पडिली. पावसाकरितां एकेक जागां खरीपच पेरलें नाहीं व रबीची पेरणी अद्याप नाहीं. वरचेवर शिंपितों. वाफसे मोडतात. कायगांवीं अशी गति आहे. कायगांवीं आश्विन शुध्द प्रतिपदेपासून पेरणीस प्रारंभ होणार होता. शिंपलें नाहीं तर होईल. सजगुरे दाहा बारा ठिकीं रानांत होतीं ते केवळ गेलीं. जाले तर खंडी सव्वा खंडी सजगुरे होणार. ते लोक ह्मणाले कीं, आज्ञा कराल तर मोडून दुसवटा करूं, मग मोडायाची आज्ञा दिल्ही. जोंधळयाचें पेव सां वर्षांचें होतें तें काढिलें. दाण्यास वास फार लागला. मधील दाणे तीन सव्वा विकतात. बहुतसे कोणी घेत नाहीं. जितके विकतील तितके विकोत. चोखट दाणे शहरांत पावणेपाचांनीं पल्ला आहे. गहूं साडेसा पावणेसात, हरभरे सात, तूप अर्धपाव अगळें दीड शेर, तेल साडेपांच शेर असा आजकाल आहे. यानंतर सातारियाचें कामकाज निवळ चालतें. गत वर्षाचा आकार चवदा हजार एकशेंतीन कुलमालबरगुजार, अंबराईसमेत चौथाई, सरदेशमुखी, हवालदार व शिवाय वगैरे जमाव आकारली. जमा कुलबाब कुलकानू :-