Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मनसूरअल्लीखानासी व पातशाहासी युध्द लागलें आहे. यांस पातशाहानें करोड रुपये देऊं करून मदतीस बोलाविलें व मनसूरअल्लीखानांही करोड रुपये देऊं करून बोलाविलें. त्यास पातशाहाकडेच जातात. मागोन पंचवीस हजार फौज पेशव्यांनी नालबंदी देऊन राघोबाकडे रवाना केला आहे. जयाजी शिंदे यांस गुजराथेस, समागमें विश्वासराव यांस देऊन पाठविणार ह्मणोन वर्तमान आहे. तथ्य नाहीं. प्रस्तुत चांभारगोंद्यांत आहेत. आजपावेतों पुण्यांतच होते. तेथून आज्ञा दिधली. वस्त्रें, कडी देऊन निरोप दिला. पुढें कोणेकडे पाठवितील, हें तथ्य जालियावर लेहून पाठवूं. पेशवे पुण्यांतच आहेत. श्रावणमासी सोळा लक्ष रुपये धर्म केला. ऐंशी हजार ब्राह्मण मिळाले होते. तीन दिवसपावेतों दक्षिणा दिल्ही. मुठीनें, वोंजळीनें, चुकटीनें अशी दक्षिणा दिल्ही, मोजून दिल्हें नाहीं. कोणास पांच आले, कोणास पंधरा, पंचवीस, चाळीस, पन्नास, शंभर असेही आले. याप्रकारें जालें. आनंदरूप बसले आले. मोगल व जानोजी वगैरे यांची गलबल त्यांचे गणनेंतही येत नाहीं. असें आहे. यानंतर धाकोणीचा ऐवज आह्मीं घेतला नाहीं. आज्ञेप्रमाणें उभयतां वेदमूर्तीस निरोप सांगितला आहे. उत्तर काय होईल तें लेहूं. घरी सावध आहों. सांप्रत चोरांची गलबल उठली आहे. रात्रीस गस्त दोनदां फिरते. आपणाकडून सावधता आहे. गांवकुसूं पावसानें चोहोंकडे पडले आहे. दिवाळी जालियावर काम लावूं. वरकड गावचें कामकाज अद्याप निवळ चालतें. निळव्यांची विक्री लागली आहे. थोडीं बहुत ठिकी आहेत ते विकतात. पानें खुडतात. गतवर्षी बरगुजार पावणेपांच हजार आले. अवघा आकार चवदा हजारपावेतों आला. आंबराई व शिवाय सभेत सरदेशमुखी आला. कळावें ह्मणोन लिहिलें असे. सांप्रत दाणेभाव :- जोंधळे उत्तम पांच पावणेपांच, व गहूं साडेसा पावणेसात, व हरभरे सात, तूर्प अर्धपाव आगळे दीड शेर, तेल साडेपांच शेर याप्रमाणें आहे. कायगांवचे जुने दाणे सा वर्षांचे काढिले तेमधील चोरवट तीन सव्वा तीन रुपयांनी पल्ला कायगांवी विकतात. थोडे बहुत विकले. वास फार येतो, यास्तव कोणी घेत नाहींत. विकतील तसें विकूं. कळलें पाहिजे. सइद लष्करखानाचे भेटीस एकदां गेलों होतों. भेटी जाली.वडिलांचे वर्तमान पुशिलें. स्तवन वडिलांचे करीत होता. उत्थापन दिल्हें. परंतु, मोगल लोक कामापुरते आपले हवेलीत नहर येत होता तो फोडिला. त्याजकरितां अगोदरही हटकविलें होतें व आह्मी समक्ष सांगितलें. परंतु त्याच्यानें आज्ञा देवविली नाहीं. उगाच राहिला.परोक्ष ह्मणतो कीं, त्यांचें मजला बहुत अगत्य आहे, परंतु उपाय नाहीं. दरगाहकूलीखान, शहानवाजखान यांचे नहर बंद केले आहेत. यास्तव यांचा मोकळा करतां येत नाहीं. असें आहे. आह्मी त्याजवर त्याचे भेटीस गेलों नाहीं. आजकाल मुख्यत्व अवघें याजवरच आहे. सलाबतजंग नावांस पात्र आहेत. याप्रकारें जालें वर्तमान लिहिलें असे. यानंतर बाबा पाठक सावखेडयांत जाऊन, महिनाभर वास करून, अतुल सन्यास घेऊन समाप्त जाले. पूर्वी वडिलांस लिहिलेंच आहे. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार.