Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७७]A श्री. १ मार्च १७५१.
सेवेसी विद्यार्थी नरसिंगराऊ सा. नमस्कार विनंति उपरि येथील कुशल वर्तमान फाल्गुन वद्य प्रतिपदा जाणोन स्वामीनी आपले स्वानंद वैभवलेखन आज्ञा करीत असिले पाहिजे. विशेष. कृपापत्र पाठविलें ते पावलें. वर्तमान विस्तारें विदित झालें. आपण वर्तमान लिहिलें तें सर्व यथास्थित. राजश्री रामदासपंताचें पत्र ता. छ २६ रबिबलावल आज छ १३ रबिलाखरीं पावले. सविस्तर वर्तमान आदि अंत लिहिलें आहे. पठाणास मारून घेतलियावर मुजफरजंगास तीर लागला. डोल्यांतच शांत झाले. परंतु पं मजकुरांनी त्यांजला उठून बसवून, लोकांत ऐसे जाणविलें की जिवंत आहे. सर्व लोकांस हिंमत देऊन, डेरेदाखल जालियावर प्रगट केलें व सलाबतजंगास मुबारकबाद दिली त्यास सलाबतजंगानीं यांजला बोलावून बहुत समाधान केलें व बहादुरीचा खतबा दिला व काम दिवानीचें यांजवर बहाल राखिलें. यांचा हेतु होता कीं, धनी कदरदान गेला असतां काय मामला करावा. परंतु त्यांचा हेत बहुत पाहिला, उपाय नाहीं. फिरून इनायत पत्रें अबदुल खैरखान वगैरेचे नांवें व आमचे नावें सत्वर स्वार होयानिमित्त पाठविली, व स्वामीस पंत मजकुरांनी नमस्कार लिहिला, ऐसें पत्र पावलें. इंद्रप्रस्थींहून गाजुदीनखानाची ही पत्रें समस्तांस आमचेच हातें प्रविष्ट झाली. फर्मान बागलाणियाचा अबदुल खैरखानास आला. आमचेच हातें प्रविष्ट झाला. मर्यादेप्रमाणें घेतला. आह्मांस बहुमान वस्त्रें दिली. आतां सलाबतजंगाचीं पत्रें आली आहेत. उदयिक पावती करितों. पहावें काय विचार होतो व लोक कोणाकडे होतात. ता. छ २२ रबिलोवल. गाजुदीखान दिल्लीतच आहेत, बाहीर निघाले नाहीत.