Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३७७] श्री. २१ फेब्रुवारी १७५१.
पै॥ फाल्गुन वद्य १०
सोमवार शके १६७२
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नागोराव भागवत चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना ता. फाल्गुन शुध्द १४ मु. कापशी नजीक बेदर येथे स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहलों तें लष्करांत येथेंच मुक्कामी पावलों. सकल वर्तमान खानांनी सांगितल्याप्रमाणे सर्व निवेदन करावयाचें तें केलें. श्रीमंतांची मर्जी माघारी फिरावयाची होती, परंतु लांब आलें. दुसरें, ये प्रांतीचे पाळेगार तमाम येऊन भेटले. घास, दाणे, खंडण्या तमाम मुलकांत घेत भागानगर डावें टाकून कडप्याचे सुमारें निजामअल्ली कडेस जावें हा हेत धरिला आहे. त्याची पूर्तता जाहालियावर त्यांस समागमें घेऊन गंगेचे कांठी शहर औरंगाबादेजवळ येऊन राहावें हा विचार आहे. आपणही खानास पत्र लिहिले आहे तें खानास पावतें करावें. रा. चिंतामण नाईक यांचे जासुदासमागमें सरकारचें पार्शी पत्र व आमचें पार्शी पत्र ऐशीं दोन पत्रें पाठविली, ती खानास पावती करून वर्तमान येथील सांगावें. आपण वामोरीस कागद घरास लिहिला तो अगत्यरूप पावता करून उत्तर आणवावें. कामाचा कागद आहे. अगत्यरूप पावता करावा. बहुत काय लिहिणें. लोभ असो द्यावा. हे विज्ञापना.