Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३४९]                                                                         श्री.                                                                १ जानेवारी १७४४.

श्रीमद्भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज तुळाजी आंगरे चरणावर मस्तक ठेऊन दंडवत् प्रणाम विज्ञापना. तागायत पौष बहुल त्रयोदशी रविवासरपावेतों स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विनंति. स्वामीनीं बहुतां दिवशी आशीर्वादपत्र पाठविले. प्रविष्ट होऊन मस्तकी वंदून सनाथ जाहलों. सदैव आशीर्वादपत्री सांभाळ केला पाहिजे. पत्रीं कित्येक विस्तारेकरून पत्रलेखनें आज्ञा केली. त्यांस सारांस अर्थ अभिप्राय पाहातं, महादेव शेवडा याचा व अंता तेली गोठणेकर या हरदूजणांचा कज्जा आहे; याजकरितां महादेव शेवडा याजपासून दुप्पट रुपये घ्यावे आणि पारपत्य करावें; ह्मणजे स्वर्णाभिषेक केला ऐसे होईल, ह्मणोन आज्ञापिलें. ऐशास, बाबा ! स्वामी ! आपण परमानंदि सुखानंद अनुभव असतां, आपणांस सर्व समानत्व आहे. तशाहीमध्यें हरदूजणाचा करीना ये जागां आणून, पंचाएतमतें मनास आणून, दरहक्क मुनसफी केली असतां, आह्मां सेवकांचा विश्वास न मानतां लहान मनुष्यानें विदित केलें त्याजवरून आपण शेवट मजकूर याचे ठायीं होप केला, परंतु शेवडयाचा अन्याय आहे ऐसें नाहीं. तशाहीमध्यें मनुष्य चुकतच आहे. परंतु स्वामी समर्थ, तदनुरूप कर्तव्य तें करावें. वरकड आपणास सर्व समान आहे, तेथे विस्तारें लिहावें ऐसें नाहीं. वरकड, आह्मा सेवकांस आपली आज्ञा ते प्रमाण, व आपल्या आशीर्वादापरती जोडीची इच्छा नाहीं. गांवखेडयाचा मजकूर कितेक विशदार्थे लिहिला. तरी, बावा ! स्वामी ! हा सर्व मनसबा स्वामीचा. आह्मी संरक्षणार्थ स्वामीचे सेवक आहों. तेथें सेवक लोकांवर क्षणक्षणा शब्दारोप ठेवावा ऐसें नाहीं. स्वामीचे सेवेसी किमपि अंतर नाहीं. वस्त्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. सेवेसी विदित जालें पाहिजे. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. मौजे गोठणें येथें शामळानी हरएकदिवशी उपसर्ग न करावा ह्मणून आज्ञापिलें. त्याजवरून याउपरी कोणेंविशी तगादा लागणार नाही. वेठबेगार लागणार नाहीं. हे विज्ञापना.