Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३५४]                                                                         श्री.                                                                 २ जून १७५१.
 
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब यांणी मोकदमानी मौजे धावडशी ता परळखोरें यांसी आज्ञा केली ऐसीजे :- मौजे मजकूरची रयत लष्करचे कहीमुळें परागंदा जाहाली, ह्मणून हुजूर विदित जाहालें. तरी रयतेची दिलभरी करून लावणीसंचणी होय तें करणें. अभय असे. जाणिजे. छ १८ रजब, सु॥ इसने खमसैन मया व अलफ लेखनावधि.


[३५५]                                                                         श्री.

श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-

चरणरज रघुनाथ हरी कृतानेक साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति. येथील कुशल स्वामीचे कृपेकरून असे. विशेष. स्वामीनीं कृपा करून बहुत दिवशी आशीर्वादपत्र पाठविले तें प्रविष्ट होऊन मस्तकी वंदिलें. पत्री आज्ञा केली की, ''सरखेलीजवळ आमची ठेव अठरा घोडे व पदकें, तुरें, पुतळयाच्या माळा व चाफेळयाच्या माळा व वस्त्रें, व याखेरीज साठ हजार रु॥ नक्त व पेशजी सुवर्णदुर्गी तीन हजार होन दिल्हे व गाडीचे बैलाची जोडी तीनशें रुपयांची दिल्ही हें तुह्मांस अवघें ठावकें आहे. त्याचे डोळे उघडून पैके दिल्हे तरी बरेंच जाहाले. न देई तर ज्याचे तो घ्यावयास बळकट आहे. तुह्मी प्रतारणा न करितां तपशीलवार पैका व जिन्नस तपशीलवार लेहून पाठविणें'', ह्मणोन स्वामीनीं आज्ञा केली. ऐशास, स्वामीचे आज्ञेपेक्षां आपणास दुसरी जोड काय आहे ? परंतु बहुता दिवसांची गोष्ट तपशीलवार लेहून पाठवावयास स्मरण कांही राहिलें नाहीं. वरकड स्वामीची वस्तभाव, घोडी, बैल, टक्का, पैका, स्वामी स्वारीस जाऊन आणीत होते व पाठवीत होते ते सरखेलीजवळच पाठवीत होते. त्यांचा आपला विनाभाव किमपि नव्हता. स्वामीही त्यांजवरी कृपा तैशीच करीत होते. त्यास कैलासवास जाहलेयावरी सेखोजीबावावरही स्वामीची कृपा नि:सीम होती. त्याजमागें संभाजी आंगरे याचे हाती दौलत आल्यावरी याणी स्वामीचे स्वामीस काय दिल्हें किंवा न दिल्हें हें आह्मास काय ठावकें ? आमचाच उच्छेद त्यांणी करून दारबीदार केलें. हे सर्व स्वामीस विदित आहे. आतां त्यांचे वंशी कोणी असतील त्यांही स्वामीचे स्वामीस देऊन, वडिलांस त्या ऋणापासून मुक्त करावें आणि स्वामीची कृपा संपादून घ्यावीं हेंच उचित आहे. सेवेसी श्रुत जाहालें पाहिजे. हे विज्ञापना.