Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१७] श्री. ६ फेब्रुवारी १७४६.
राजश्री जगंनाथ चिमणाजी गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मानाजी आंगरे वजारत माव रामराम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. पत्र पाठविलें तें प्रविष्ट काळी कुशलार्थ श्रवणें संतोष जाहला. वरकड कितेक अर्थ श्रीस्थायांनी साहित्याविषयींचा लिहिला कीं, स्वामीमागें कितीकांचे भरवंशाने कारखाना खर्चवेच चालविला, सांप्रत कारखाने यांचे लोक तजावजा जाहले आहेत. यांचे खर्चाची बेगमी व लोखंड, शिसें, तांदूळ इत्यादिक अनुकूल करून घ्यावीं ह्मणोन तपसीलें लिहिले प्रमाणें श्रवण जाहलें ऐशियास, श्रीयांनींच साहित्य करावें हें श्रेयस्कर कृत्य लक्षप्रकारें लिहित असे. प्रसंगोचित श्रीकृपेने साधणें. प्रसंग प्राप्ती जाहली ह्मणजे विहित गोष्ट ते आदरपुरस्कर रूपास येऊन श्रीठाई अर्पण जाहालियास आपलेंही समाधान होतें. श्रीचे कारखाने यास श्रीस सर्व साहित्य अनेकप्रकारें करतील तरीच होईल. भांडी व समयास ऐवज राजश्री साबाजी प्रभू चिटणीस यांजवळ दिल्हा होता; त्याचें काम कारीगरपणेकर करीत आहेत. फाल्गुन पौर्णिमानंतर सिध्द होतील. वरकड सविस्तर वृत्त स्वामीचें पत्रीं लिहिलें आहे. तुह्मीही निवेदन करून विदित करणें. जाणिजे. रा छ २५ मोहरम. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.