Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२३०] श्री. १३ जून १७०७.
श्रीशिव - श्री आई -
नरपति हर्षनिदान आदिपुरुष श्रीराजा
मोरेश्वरसुत नीलकंठ शिवछत्रपति स्वामी कृपा
प्रधान निधि तस्य परशराम त्र्यंबक
प्रतिनिधि.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् नाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल एकादशी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांनी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सु॥ प्रांत राजापूर यांसी आज्ञा केली ऐसीजे : रामाजी नारायण उपनाम कोलटकर वास्तव्य कसबे नेवरें यांनी स्वामीसन्निध येऊन विनंति केली कीं, आपण आजीवरी स्वामीच्या राज्यांत वास्तव्य केलें. सांप्रत आपली वासना आहे कीं, एक स्थळी रहावें आणि श्रीभजन करून स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण इच्छून असावें ऐशी इच्छा आहे. तरी आपली थोडीबहुत अन्नाची अनुकूलता करून दिधली पाहिजे. ह्मणून त्यावरून मनास आणितां रामाजी नारायण भले, हरिभक्तिपरायण, स्वामीचें कल्याण व्हावें ये गोष्टीची अपेक्षा विशेष करतात. याकरितां यांचे लेकराचे लेकरी चालवणें स्वामीस अगत्य जाणून, स्वामी याजवर कृपाळू होऊन, यांसी नूतन इनाम, कुलबाब, कुलकानू देखील हल्लीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हक्कदार करून पूर्वी र॥ अनाजी दत्तो यांचे वेळेस जमिनीस धारा व गलियाप्त निरख होते त्याप्र॥ बागायत व जिरायत मिळून वाडा कासारवली मौजे पुसाळें ता॥ नेवरें या गांवपैकी करी दाभोळी ३०० तपशील :-
हालीकर्दीपैकी करी दाभोळ ७५. । पडीपैकीं करी दाभोळी २२५.
एकूण करी तीनशें इनाम अजरामऱ्हामत करून दिला आहे. तरी तुह्मीं सदरहू बेरजेचीं ठिकाणें जिरायत व बागायत अगर नेमून देऊन चतु:सीमा करून, याचे दुमाले करून, यांसी इनाम वंशपरंपरेनें चालवणें. सालदरसाल ताजा सनदेचा उजूर न करणें. या सनदेची तालीक लेहून घेऊन असल सनद भोगवटियासी याजपाशी परतोन देणें. जाणिजे. लेखनालंकार. मर्यादेयं विराजते.