Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

 [२३५]                                                                      श्री.   
                                                                           उलूककल्प.                                                               

उलूक दिवाळीचे रात्रीस, अथवा चतुर्दशीस, अथवा अष्टमीस, धरावा; पोटांतील नसा काढून तेल करावें; त्याचें काजळ धरावें; आपल्या डोळ्यांत अंजन करावें; तेणे अदृश्य होय ॥१॥ गोमुत्रें डोळे धुवावे; प्रगट होय. उलुकाचे मुखीं पारा टाक येक घालून तीन दिवस ठेवणें; मग तुपाशी सेविजे; दिवस एकवीस, मग गमन बहुत करी ॥२॥ आणि कंदर्प बहुत होय ॥३॥ त्या उलुकाच्या मासाचा टिळा लाविजे; भलत्या प्रकारें लाभ होय ॥४॥ त्याची हाड अन्नाशी भक्षिजे; जो देरवे तो दास्यत्व करी ॥५॥ त्याची चोच व पाय व कान जाळून राख करावी; राखेचें पाणी करून पायी लाविजे; त्वरीत कोस गमन करी ॥६॥ त्याचा डोळा काढून, हरताळ व मनशीळ, तिन्ही वस्ता एकत्र करून, डोळया अंजन कीजे; तरी पाताळीचें धन दिसे ॥७॥ त्याची जीभ व गोरोचन एकत्र करून, तांब्याच्या ताइतांत घालून मुखीं धरी; तरी तो अदृश्य होय ॥८॥ उलूकाचे पंख शत्रूचे घरीं बुजून ठेवणें, वेळा सत्तावीस; अनेन मंत्रेण बळी बधन बधे मित्तीष्टी बळिस्वाहा; शत्रू मरे ॥९॥ उलुकाची राख व बेलपत्राची राख ताइतांत घालून ठेवणें; गमन सिध्दी होय ॥१०॥ काळजांतील हाड, मासोळीचें तेल, शत्रूचें द्वारी ठेवणें; उच्चाटण होय ॥११॥ मस्तकीचे पंख, उंदराची लेंडी, त्याचे धुणें भूतप्रेत पळे ॥१२॥ नेत्र व गायीचे तुपे टिळक करणें; राजा वश्य होय ॥१३॥ काळजाचें व डोळ्याचें रक्त, तेणें अंतन कीजे; अदृश्य होय॥ १४॥ डाव्या पायाची नळी व पारा टोक एक, टाळूचें हाड, मस्तकी ठेवणें; संग्राम जिंकी ॥१५॥ जीभ धोत्र्याचे रसें टिळक करणें; राजा वश्य होय ॥१६॥ चोचीपाशील चिन् आपल्या तळव्या लावणे; गमन बहुत होय ॥१७॥ मस्तकीचा मगज व पुच्छ व पंख व तळहाड एकत्र करून ठेवणें; अंजन कीजे; निधी दिसे ॥१८॥ जीभ तायितीं घालून ठेवणें; सर्व वश्य होय॥१९॥ छ॥ छ॥ छ॥ मंत्र: ॐ श्रीं व्हीं क्लीं ऐ यं सोहं माहालक्ष्मी मम सर्वा सिध्दि करू २ स्वाहा ॥२०॥ अष्टोत्तरशत जप करणें, मग जें करणें तें कीजे. सिध्दि होय ॥२१॥ छ॥ छ॥ जगदंबार्पणमस्तु ॥१॥ छ॥ छ॥