Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
कोणी एक असामी मागें न राहे तो गोष्ट करणें आह्मी स्वार होऊन गेलों असें समजोन तिळतुल्य दिरंगावर न घालितां फौजेची रवानगी करणें. राजश्री सुलतानजी आटोळे यांजकडे पत्रें व मनुष्यें पाठवून, त्यास आणवून, त्याचें समाधान करून, बोलीचाली करणे ह्मणोन लिहिले. ऐशियासी, त्यांजकडे चार पांच वेळा पत्रें पाठविली. परंतु मशारनिले कडील कोण्हीच आलें नाहीं. आह्मीं यत्नास चुकलों नाहीं. ऐशियासी, त्याजकडील राजश्री गोपाळपंत सातारेयासी आहेत. त्यास, मशारनिलेजवळ जे बोलीचाली करावयाची असेल ती करून ज्याप्रमाणें आह्मांस लेहून पाठवाल त्याप्रमाणें आह्मांस मान्य आहे. तरी सत्वर बोलीचाली करून त्यांस आह्मांकडे रवाना करणें. सर्वप्रकारें त्यांचे चालवावयास अंतर होणार नाही. व गंगाजळ मातुश्री राधाबाई ढमढरी यांचेविशी लिहिलें की, संगोजी ढमढेरे याबाबद घोडीं, वस्तभाव देवणें व त्याची बोलीचाली केली आहे, त्यास समाधानाचें पत्र पाठवणें. ह्मणोन लिहिलें; तरी, त्यास समाधानाचें पत्र पाठविले असें. तुह्मीं त्याजकडील जमाव सत्वर रवाना करणें. याउपरी तमाम लोकांस जलदीने पत्रें पाठवून अविलंबे राजश्री बाबूराव यासी फौजेसहवर्तमान रवाना करणें. येविशी विस्तारे ल्याहवें ऐसें नाहीं. वरकड कितेक वर्तमान राजश्री भास्करपंताकडील व आह्माकडील, राजश्री, जिवाजी अनंत पाठविले आहेत, हे सांगता कळो येईल. र॥ छ २९ माहे रजब. + आतां वारंवार ल्याहवें ऐसें नाहीं. तर बाबूची रवानगी फौजेसुध्दां सत्वर करणें. निदानचें हे पत्र आहे. तर आतां आळस करावयाचें काम नाहीं. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.