Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
व्यंकोजीच्या मागून त्याचे तीन मुलगे शहाजी, सरफोजी व तुकोजी हे एकामागून एक तंजावरच्या गादीवर बसले. त्या सर्वांनीं मिळून अजमासें पन्नास वर्षेंपर्यंत राज्य केलें. (इ. स. १६८७---१७३५ ) शहाजीच्या कारकीर्दींतील मुख्य गोष्ट म्हटली ह्मणने मोंगलांचा सुभेदार झुलपिकारखान याची तंजावरावर स्वारी होय. संभाजीस ठार मारून त्याचा मुलगा शाहू यास बादशहानें कैद करून नेल्यानंतर महाराष्ट्रांत राहून औरंगजेबाच्या फौजेशीं झुंजणें अगदीं अशक्य, असें सर्व मराठा सरदार मंडळास वाटलें. तेव्हां राजाराम आपल्याबरोबर अजून भगव्या झेंड्याचा अभिमान बाळगणारे कित्येक मराठा सरदार व मुत्सद्दी होते त्यांना घेऊन दक्षिणेंत आला व पाँडिचरीजवळ जिंजी येथें त्यानें आपलें ठाणें दिलें. तेव्हां मोंगल सैन्यानें दक्षिणेंत चाल करून जिंजीस वेढा दिला. एकदां या पक्षास जय तर दुस-या वेळेस उलट बाजूस, याप्रमाणें हा वेढा पुष्कळ वर्षें चालला होता. त्या अवधींत मोंगलांच्या सेनापतीनें तंजावरच्या राजापासून खंडणी वसूल केली व त्रिचनापल्ली प्रांतांतील तंजावरचा कांहीं भाग घेतला. शहाजीनंतर सरफोजी व तुकोजी हे तंजावरच्या गादीवर बसले. त्यांचे वेळीं तंजावर येथील मराठ्यांनी रामेश्वराच्या आसपास सर्व प्रदेशावर आपली सत्ता वाढविली. शिवगंगा व रामनाथ येथील जमीनदारांस इ. स. १७३० च्या सुमारास मराठ्यांनीं जिंकून आपल्या ताब्यांत आणिलें. हे जमीनदार ह्मणने छोटे जहागीरदार असत. तंजावर येथील गादीवर पराक्रमी राजा असे तेव्हां हे त्याला खंडणी देत; पण तोच जर दुर्बळ असला तर त्याची सत्ता हे जमीनदार पार झुगारून देत.
इ० स० १७६३ व १७७१ या सालीं मराठा सेनापति सिधोजी व माणकोजी यांनीं हा प्रांत पूर्णपणें जिंकून ते बरेच प्रसिद्धीस आले. व माणकोजीनें तर इ० स० १७४२ पासून १७६३ पर्यंत चाललेल्या युद्धांतही बरीच कामगिरी बजाविली.
व्यंकोजीच्या तीन पुत्रांच्या कारकीर्दीनंतर तंजावर येथील गादीवर इ० स० १७३६ पासून १७४० पर्यंत पुष्कळ राजे बसले. कारण कीं, कांहीं राने अकालीं मेले व कांहींना गादीवरून काढून त्यांच्या ठिकाणीं मोंगल सेनापतींनीं आपल्या हुकमतींत असणा-या राजांत गादीवर बसविलें. सरतेशेवटीं तंजावर दरबारांतील मराठा अधिकारिवर्गानें खटपट करून तुकोजीचा दासीपुत्र प्रतापसिंह यास इ० स० १७४० त गादीवर बसविलें. प्रतापसिंहानें २३ वर्षे राज्य केलें.