Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब सुरापुराकडील पत्राचे छ ११ लेखांक ३६. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
राखर जासुदा समागमें.
राजेश्री राजे व्यंकटप्पा नाईक बळवंत बहिरी-बहादूर गोसावी यांस-
सकल गुणालंकरण-अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्नो गोविंदराव कृष्ण असिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें विशेष पत्र पाठविले ते पावले राजेश्री गोविंद अप्पा यांस तिमाप्पा व श्रीपतराव समागमे देऊन पुण्याकडे रवाना करितो तेथून आल्यावर उभयेतास सांगावयाचें ते सांगोन पाठऊन देतों सर्वविषईं आधार आपला ह्मणोन तपसिले लिहिलें त्यास नवाब मंत्रीपासी संस्थानचे अहवालाचा बयान करावयाचे रीतीनें करून जो जाबसाल ठरावांत आला त्याचा तपसिल तिमाप्पा व श्रीपतराव यांनीं सांगितल्यावरून समजला असेल येके महिन्यांत आपल्याकडून ठराऊन येण्याचा करार त्यास आधिक दिवस जाले हाली गोविंद अप्पा व उभयतां पुण्यास जाणार तेथून आल्यावर इकडे येण्याचा बेत लिहिला लांबण फार फार पडली यांत मंत्रीची मर्जी कसी राहील पाहावें सिवशंकर-पंत यांस हजूर पाठविण्याचा करार येथे ठरला त्याप्रो मार-निलेची रवानगी व्हावी ऐसे असोन अद्याप येणे होत नाहीं याजकरिता मंत्रीचे बोलण्यांत येक दोन वेळां आलें यास्तव सिवशंकरपंत यांची रवानगी सत्वर करावी ह्मणजे पुढील जाबसालास नीट पडेल छ ११ साखर बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.