Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजश्री व्यंकटराम पिला                                                            लेखांक २२३.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
गोसावि यांस.

श्नो बालाजी जनार्दन आसीवाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष तुह्मी छ २५ माहे रजब ता छ ८ माहे साबान पावेतो अखबार पा ते पावली त्याची कलमें.

१  तोफा रेड कुडते बनाती व सफेत आंगरखे व सफेत नवार पोषागी कोपड बंदुखा बनातीचे तागे व टोप्या च्याहाचा संदूख इतका सरंजाम फर्मासी एथून हैदराबादेस रवाना जाला ह्मणोन लिा तें कळलें कलम.
१  ज्यानपूर नावे विलायतीमध्ये बंगाल्याची गौरनरी मुकरर पावला विलायतेहून परभारा बंगाल्यास पावला त्याचा यत्खीयार मामले पेषावर सिपायगिरीचे कामावर मंबईचा आबरकरंबी करार जाला ह्मणोन लिा तें समजलें कलम.
१  लाट कारनवालीस यास विलायतेहून मारकेस ह्मणोन खिताब देऊन दुसरा वजीर मुकरर केलें लाट या पटीस येणार ह्मणोन लिा तें समजलें वरचेवर बातनी पकी लिहीत जाणे कलम.
१  टिपूबाहादर यांजकडील पालेगार बागी होऊन च्यारगलचे पालेगाराचा आश्रा केला टिपूनें गौरनरास लिहिलें होतें हाली ऐकण्यात टिपूबाहदरानी पालेगारास धरून आणून कैद करावें सबब कांहीं जमीयत च्यारगल्यास रवाना केलें ह्मणोन लिया त्यास हे कंपणी इंग्रजबाहदूर यांचे सलाहाने किंवा गैरसलाहाने याचें तहकीक करून लिहिणे........कलम.
१  बंगाल्याहून जाहाज आलें तें विलायतेस रवाना जालें त्याजवर बसून गेले त्याची नावें लिहिली ती कळली कलम.
१  लाट कारनवालीस बंगाल्यास आहेत तोपावेतों यत्खीयार त्यांचा ऐसा विलायतेचा हुकूम ह्मणून लिा तें कळलें कलम.
१  लाट कारनवालीस विलायतीस जाण्यास्तव चेनापटणास येऊन एथें महिनाभर राहून मग विलायतेस जाणार ह्मणोन लिो त्यास कारणवालीस चेनापटणास कधी येणार याची पकी बातनी राखून लिहिणे कलम.
--  
 


एकूण कलमें सुमार सात लाट कारनवालीस यांस विलायतीस वजिरीची खिदमत होऊन मारकेसी खिताब होऊन आला त्यास टिपूबाहदरानी व त्यांजकडील गुलामअली आहे त्यानीं मुबारकबादीची पत्रें पाठविलीं व वालाज्याहा यानीहि मुबारकबादीची पत्रें पाठविलीं ह्मणोन लिा तें समजलें वरचेवर पकी बातनी घेऊन पाठवीत जाणे रा छ ७ रमजान बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.