मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

व्यंकटपा नाईक सुरापूरकर याचे                                                 लेखांक २०३.                                                      १७१५ अधिक वैशाख वद्य ७.
पत्राचें उत्तर छ २० रमजानीं.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बाहादूर गोसावि यासि-
5 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्ना गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मीं पत्र पा तें पावलें संस्थानसमंधी नवाबाचे सरकारचा जाबसाल ठरावात आला त्याचे ऐवजाची सरबराई होणे पैकी कांहीं चिटी पुण्यास पाठविली आणिकहि कांही चिटी स्वल्प दिवसांत पाठवितो ह्मणोन ता - लिहिलें व राजश्री गोविंदराव यांचे पत्र संस्थानचे साहित्यप्रकर्णी मंत्रीसी बोलण्याविसी पाठविलें यावरून सविस्तर ध्यानांत आले त्यास मंत्रीसी संस्थानचे नादारीचा प्रकार बहुत कांहीं बोलण्यात आला त्यांचे ह्मणे की एक महिन्याचा करार असतां किती दिवस लांबण पडली या जाबसालांत आपण सबब इतके दिवस सबूरी जाली याप्रा बहुत बोले त्यास मंत्रीस तुह्मी आपलें एक पत्र ममता व घरोब्याचे विच्यारें पाठवावें त्यांत संस्थानचे नातवानीचा प्रकारहि दर्शऊन सर्वप्रकारें पार पाडणे आपणाकडे सविस्तर फलाणे अर्ज करतील याअन्वयें जरूर यावें ह्मणजे बोलण्यास फार सेमर्पक पडेल ऐवजाचा भरणा गोविंदराव यांजकडे लौकर करून त्यांचे पत्र आह्मांस यावें यास विलंब न व्हावा नवाब बंदगानअली यांचा मुकाम तूर्त बेदरावर आहे रा छ २० रमजान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries