Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

त्रिंबकपंत आणा यांस पत्र.                                                           लेखांक १५७.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबकपंत आणा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें। लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पो ते पावलें वो राजश्री बाळकृष्णदेव व वो राजश्री नारायणदेव यांची सून श्रीकासीहून आली आठ दिवस एथे राहून बारामतीस जाणार तेथून आपणाकडे यावे हे त्याचे मानस आहे इत्यादिक लिहिले व श्रीमंताचे लग्न जाले ह्मणून लिा ते सर्व कळले बारामतीची मंडळी वर्षप्रतिपदेस एथे येऊन पावली मातुश्री चिमाबाई यांच्या येण्याचा मजकूर लिा त्यास नवाब्याच्या स्वारीची निघण्याची गडबड आहे याजकरितां तूर्त चिमाबाई याणी येण्याची गडबड करू नये पुढें लेहू तैसे करावे सौरवती मातुश्री आकाबाई यांची प्रकृत स्वस्थ नाही घरचे आत्मीय मनुष्याने त्यांचा परामृष करावा ऐसे तेथे कोणी नाही याजकरितां मातुश्री चिमाबाई यांस आमचा निरोप सांगावा की आकाबाई यांजपासी तुह्मी जाऊन राहावे त्यांचा समाचार घेत जावा ह्मणजे आमचे मनाची स्वस्थता होईल ऐसे त्यास सांगून त्यांची रवानगी बारामतीस करावी आह्मीहि त्यास पत्र लिा आहे तुमच्या असामीच्या ऐवजाच्या तनख्याचा इनायतनामा शमषुलउमरा याजकडे देऊन महमदअजीमखा यांचे पत्र सिदीइमामखान यांस देऊन राजश्री रघुनाथपंत यांजकडे रवाना केले ऐवज येण्यास आतां गुंता नाही ऐसे गोविंदराव यास सांगून मुबादला ऐवज येण्याचा राहिला असेल तो त्यांजपासून घ्यावा रा छ ४ साबान बहुत काय लिा लोम कीजे हे विनंति.