Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ८४
१६२० आषाढ शुद्ध ८

श्री


स्वस्ति श्री राज्याभिषेकशक २५ बहुधान्य नाम सवत्सरे आशाढ शुध अस्टमी भोमवासर दीत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी राजश्री भानजी गोपाळ मुख्य देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी सरसुभा प्रात क-हाड यासि आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ति ब्राह्मणसमुदाय वास्तव्य कसबे क-हाड क्षेत्र याणी स्वामीसमीप वसतगडीच्या मुकामी येऊन विदित केले की आपण ब्राह्मणसमुदायास आदलशाहाचे वेळेसी इनाम भूमि चालत होती त्या उपरी महाराज राजश्री कैलासवासी स्वामीस देश अर्जानी जाला त्याही कुल वरघाटे वतनदार याची इनामे अमानत केली ते समई आपली इनामत ही अमानत करून ब्राह्मण पाहोन त्यास धर्मादायाची मोईन करून देऊन पाववीत होते तेणेकडून योगक्षेम चालवून क्षत्रवास करून आपली सत्कर्माचरणे करून राहिलो होतो त्या उपरी अलीकडे देशात ताब्राची प्राबल्यता विशेष जाली होती तेणेकडून देश उद्वस जाला कितेक ब्राह्मण स्थलातरे गेलो होतो ऐसियास महाराजाचे प्रतापे कडून पुन्हा मागती देश स्वामीस हस्तगत जाला आहे महाराज देवब्राह्मणप्रतिपालक आहेत यास्तव महाराजाचे राज्यात आह्मी अवघे ब्राह्मणसमुदाय येऊन पुन्हा स्वस्थली राहिलो परतु देश कितेक खराब पडिला आहे याकरिता धर्मादाऊ मोईन प्रमाणे पावोन आपला योगक्षेम चालत नाही यास्तव राजश्री रामचद्र पडित अमात्य याशी ईस्वर सवत्सरी वसतगडीच्या मुकामी होते तेथे विनति केली त्यावरून त्याही मनास आणून धर्मादाऊ मोईन प्रमाणे पावत नाही ह्मणून धर्मादायाची मोईन होती व आदलशाहाचे वेळेस इनामत होती ते कुली दूर करून ब्राह्मणसमुदायास अग्रहार मौजे सैदपूर पा। क-हाड हा गाऊ आहे त्याचे नाव सिवापूर ठेऊन क-हाड क्षेत्री ईस्वर सवत्सरी जम्नास्टमीचा पर्वी यथायोग्य सकल्प करून स्वामीच्या नावे धाराउदक घालून अग्रहार देऊन आपले पत्र व राजमुद्रेचे पत्र करून दिल्हे आहे व ब्राह्मण पाहोन यथाविभाग भूमी वाटून देवऊन राजश्री पडितरायाचे पत्र करून देवविले आहे त्याप्रमाणे मौजे मजकूर कुलाबाब कुलकानू हालीकटी व पेस्तरपटी व जलतरुपाशाणनिनिधनिक्षेप सर्वमान्य खेरीज हकदार व इनामदार करून चालत आहे ऐसियास स्वामी या प्राते आले आहेत तरी सदरहूप्रमाणे अग्रहार चालविलेया स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चितून आपली स्नानसध्यादिक सत्कर्माचरणे करून क्षेत्री वास करून राहोन हाणून विस्तारे श्रुत केले त्यावरून मनास आणिता ब्राह्मणसमुदाय विशेश बहुत थोर विद्वाण आहेत याचा योगक्षेम चालून सुखरूप क्षेत्रवास करून राहिले पाहिजेत ह्यणून रामचद्र पडित अमात्य येही आदलशाहाचे वेळेसी इनाम होता व आपल्या राज्यात धर्मादाऊ होता तो कुली दूर करून मौजे सैदापूर पा। क-हाड या गावचे नाम सिवापूर ठेऊन मौजे मजकूर प्राचीन सीमायुक्त खेरीज हकदार व इनामदार करून कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तरपटी व जलतरुपाशाण व निधिनिक्षेप सहित सर्वमान्य दिल्हे आहे त्याप्रमाणे करार करून दिल्हे असे तरी ब्राह्मणसमुदाय क्षेत्र कसबे क-हाड यास व याचे पुत्रपौत्रादि वौशपरपरेस उत्तरोत्तर चालवीत जाणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतिवर्षी करीत नव जाणे सदरहू गाव कसबे मजकुरीच्या ब्राह्मणास अग्राहार करून दिल्हा आहे यास कोणी म-हास्ट होऊन खलेल करील त्यास श्रीवाराणसीमध्ये गोहत्येचे पातक व मूसलमान होऊन जो खलेल करील त्यास त्याच्या महजबाचा शपत आहे ये विशी धर्म शास्त्रीची वाक्ये
स्वदत्ता परदत्ता वा यो होत वसु-              स्वदत्ता द्विगुण पुण्य परदत्तानुधरा ।।
सविस्टाया कृमि र्भूत्वा                           पालन।। परदत्तापहारेण स्वदत्त निष्फल
पितृभि:सह मज्जति ॥१॥                        भवेत ||१||
ऐसी पातके स्मरोन वेदमूर्तिसमुदायास सदरहू गाव अग्रहार चालवणे नवीन पत्राचा आक्षेप प्रतिवर्षी करीत नव जाणे या पत्राची प्रति लेहोन घेऊन मुख्य पत्र परतुन भोगवटीयास वेदमूर्ती जवळी देणे लेखनालकार