Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८०
१६१९ भाद्रपद शुद्ध १
श्री
राजश्री जाधवराऊ सेनापती गोसावी यासि
सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य श्नेहाकित रामचद्र नीलकठ आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीयकुशललेखन करणे विशेष क-हाडक्षत्री बहुत थोर सिस्ट ब्राह्मण आहेत त्यास राजगृहीहून धर्मादायाचा विभाग पावोन योगक्षेम त्या ब्राह्मणाचा चालत नाही याकरिता हाली सैदापूरगाव होता त्यास सीवापूर नाव ठेऊनु समस्तब्राह्मणांस अगृहार करून गाव दिल्हा आहे तरी तुह्मी आपले तर्फेने मौजेमजकुरास कोणे हि गोष्टीचा उपसर्ग न लागे ते गोष्ट करवणे वरकडहि सरदारास ताकीद करून कोणचा हि उपसर्ग न लागे असी गोष्ट करणे अवघे ब्राह्मण मिलोन अगृहार अनभऊनु राजयास अभ्युदय चितीत असी गोष्ट केली पाहिजे छ २९ मोहरम बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा