Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ८१
१६१९ पौष शुद्ध १४
श्री
राजश्री सुभानजी नलगे हवलदार व रायाजी बालिजी सबनीस किले मलकार्जुनगड गोसावीयासि
अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्नो। रामचद्र नीलकठ अमात्य आसिर्वाद अनुक्रमे नमस्कार सुहुरसन समान तिसैन अलफ मौजे सईदापूर ता। क-हाड हा गाव क-हाडकर ब्राह्मणास अग्रहार दिल्हे मौजे मजकूर खराब तेथील मोकदम बापूजी पाटील याने तुमचे तक्षिमेचे सेत मौजे भडकबे येथे केले होते त्यास कौल देऊन आपल्या वतनावरी आणो ह्या बदल जोगोजी जाधव बारगीर किले वसतगड यास पाठविले ऐसीयास तुह्मी आपली सेते मळून घेऊन पटेलमजकुरास वतनावरी जावयास रजा द्यावी ते गोष्टी न करिता पटेलमजकुरावरी गजर करून मा।र देऊन गुरे ढोरे देखील बिशाद कैद केली आणि रजा देत नाही हे गोष्टीने तुमचे हीत कैसे होईल ब्राह्मणास गाव अग्रहार दिला हुजुरून कौल त्यास दिल्हा असता त्यास मार देऊन नागविले आहे हा अन्याये येकवेळ क्षमा केला या उपरी पत्रदर्शने पटेलमजकुराची गुरे व वस्त भाऊ बरा बजरा देऊन आपल्या वतनावरी जावेया रजा देणे फिरोन बोभाट आला ह्मणजे तुमची भीड राहणार नाही हे बरे समजणे आणि पटेलमजकुरास कोणी मारिले काशा बदल मारिले तो फत्तेखान मुसलमान आहे तो कोणाकडील त्याचा शोध करून त्यास सजा देणे आणि त्यास हुजूर पाठविणे आणि बापूजी पाटिलास निरोप देऊन गावापरी रवाना करणे व त्याची वस्तभाव जरा वजरा नेली असेल ते फिराऊन देणे हे पत्र लिहिले आहे याप्रमाणे वर्तणूक केली नाही आणि बोभाट आला ह्मणजे रायाजीपती तुह्मास शब्द विशेश लागेल हे जाणोन लिहिले प्रमाणे वर्तणूक करणे जाणिजे छ १२ जमादिलाखर निदेस समक्ष