Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २९५
१७२१ श्रावण शु।। १४ बाळबोध
श्री तालीक
जबानी बजभट जोशि व बाजी जोशि व अमचे बधु नरसिपुरकर लेहून दिल्हि जबानी ऐशी जे रगभट बिन्न दादभट याची स्त्री निवर्तली तिचे सुतक निमेचे बधु यानि धरिले बाळाजी मुकुद प्रभृति धरिले ह्यणोन तुह्मा पासि क्षेत्रकराडास अलो त्याज वरोन अपण पत्र पाठविले साताच्या नावाचे त्या पैकि मात्र अले त्यास त्याचे बोलणे अमच्या दशाहातील बंधु अतोबा अरे व दादोबा अरे व गोविंदभट अरे प्रभृति त्याचे बधु जोशि दशाह सूतकी बैसले आहेत त्यास परतु त्याचे दशाहातील होयत किंवा नव्हेत अह्मास ठाउक नाहि गोविंदभटाचे अमच त्रीरात्र अह्मी हे खरे करून देउ मित्ति शके १७२१ श्रावणशुत्ध १४ हे लिहिले सहि हस्ताक्षर बापाजी जोशि पत्र प्रमान्य बजंभट