Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १७७

श्रीवेकटेशो जयति

।। सत्याभिनवतीर्थश्रीपादस्वामी ।।
॥ श्रीमद्धरिगुरुभक्तिपरायण-॥
॥ त्वाद्यनेकगुणसपन्न वेदशास्त्र- ॥
॥अग्निहोत्रादिषट्कर्मनिरत विद्व-॥
॥द्वर्येषु श्रीमत्खट्वागपुरस्था-॥
॥शेषब्राह्मणचरणारविंदेषु म-॥
॥गळवेढस्थ कृष्ण कृतानेकसाष्टा- ॥
॥गनमस्कारा लेख्यविशेषस्तु॥

॥उपरि स्वामि यानी दया करून पत्र लिहून पाठविले ते पत्र वेदमूर्ति नारायणभट्ट घेऊन आले लिहिला अभिप्राव कळला वे- + मूर्ति भीमाचार्ये करहाटककर त्याचे भाउ विठलभट्ट त्या वरि दुरग्रामण्य उठविले आहे व्यासभट्ट मठकरी नरशिभट्ट रड्डि या दोघानी यथे प्रकट केले त्या नतर समस्त ब्राह्मणानी अन्नोदकसबध वर्जिला मग विठ्ठलभट्ट बोलला की अपणास चदी मध्ये यानी दीना वरि दया करून उक्त प्रायश्चित देउन केले हे वर्तमान समस्त ब्राह्मणास ठाउके आहे मगळवेढेकर कृष्णाचार्ये तेथे होते त्यास ठाउके आहे मणून बोलला या करिता तुह्मी पत्रा मध्ये लिहिले तुह्मी चदी मध्ये असता हे वर्तमान कैसे जाहले ते यथास्थित सत्यपूर्वक स्वहस्ताक्षरे स्पष्ट लिहून पाठवणे ब्राह्मण मणून भीड कराल तरि पुढे जड जाईल तरि अह्मास अन्यथा बोलाव्यास काय अगत्य आहे अह्मी चदी मध्ये असता तेथे आले होते तेथे च च्यातुर्मास्य बैसले होते