Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ११
१६२७ फाल्गुन वद्य ८
श्री


नकल असलास रुजू केली असे बद ५

स्वस्ति श्री शके १६२७ पार्थिवनामसवत्सरे फालगुनवद्यअष्टमी रविवासरे तदीनि वेदशास्त्रसपन राजश्री कासी पाध्ये बिन अतो पाध्ये व रुद्रो पाध्ये बिन पन्हो पाध्ये व देवो पाध्ये देशोपाध्ये धर्माधिकरणी व ज्योतिषी उपनाम गोलवलीकर वास्तव्य कसबे सगमेश्वर यासि गणोवानायक सरदेसाई मामले प्रभावली व मामले दाभोल नमस्कार उपरी तुह्मी सारगडच्या मुकामी विदित केले की आपली वृती धर्माधिकरण व ज्योतीष व देशोपाध्यपण मौजे देवघर प्रभावली विलायतीचे पासून गुढे विलायतीचे देवघर पावे तो पुरातन भोगवटा चालत आहे कसबे सगमेश्वरी धर्माधिकरण व दुसरी वृत स्वामीचे घरी घटिका ग्रहपूजन व नूतन पच्याग पुरातन चालिले असता साप्रति स्वामीचे घरी कसबे मजकुरी चिरजीव बचीचे लग्न जाहाले राजश्री कृष्णजी भास्कर याचे पुत्रास दिल्ही तेव्हा जोसी कसबेयामध्ये आपणा मध्ये घटिके विशई कलह होऊ लागला तेव्हा राजश्री कृष्णाजीपती उभयतास निराले ठेऊन स्वामीचे पुरोहित सप्रे या करवी घटिका घालऊन लग्नसिधी केली ऐसियासि स्वामीनी पूर्ववृत मनास आणून आह्मास काय आज्ञा ते करून कलह न होय ते करावे आह्मा जवल प्राचीनपत्रे आहेत त्यात प्राचीन स्तीत सर्व लिहिली आहे परतु प्रस्तुत ती पत्रे सिरसकर आमचे दायाद या पासी राहिली आहेत ते देशातरी आहेत पत्राचा प्रेत्न होता घडेल तो खरा स्वामीने वृध्ध वृध्ध आहेत यासि पुसोन जोसीयाचा आमचा कलह नव्हे ते करावे त्या वरून प्रस्तुत चिरजीव दादोबा व अतोबा याची लग्ने बहिरवगडी जाहाली या प्रसगी वेदमूर्ति सोमनाथभट कात्रे व रामभट हर्षे व बालकृष्णभट देव व पुतभट सप्रे व वासुदेवभट सप्रे हे येथे आले व कसबेचे जोसी बालजोसी सौदागर व सदासीव जोसी ये ही आले व केसो विठल कुलकर्णी मौजे धामापूर व तिमाजी कृष्ण कुलकर्णी मौजे मुचरी हे समस्त एकत्र बसोन उभयताचा कलहमोचन कैसे करावे त्या वर सर्वाच्या व उभयताच्या विचारे जाहाले जे वेदमूर्ति विष्णुभट सप्रे आमचे पुरोहित अति वृध नवद वर्षाचे हे सत्यपूर्वक सागतील ते उभयतानी मान्य करावे ऐसा नियत करून विष्णुभटास पत्र लिहिले सगमेश्वरी आमचे घरी पुरातन घटिकाविशय कैसा आहे तो सत्यपूर्वक लिहोन पाठवणे त्या वरून विष्णुभटी करीना लिहोन पोl जे सगमेश्वरी देशमुखाचे घरी गोलवलकर उपाध्ये घटिका घालीत असता रोl सोमोवानायक प्रथमस्त्रीचे कन्येचे लग्न सगमेश्वरी केले सौदालकर देशमुखाचे घरी दिल्ही ते वेलेस प्रभावलीचे मामलेकार अनत जोसी व गण जोसी मामलेचे हवलदाराचे पत्र सोमोवानायकास घेऊन आले की तुह्मी मामलेचे सरदेसाई आणि अनत जोसी व गण जोसी मामलेयाचे ज्योतिषी याचे तुह्मी आपले घरी ज्योतिष चालवणे त्या वरून सोमोवानायकी मामलेकर जोसी यास कसबे मजकुरी दुसरी घटिका दिल्ही त्या वरी मामलेदार जोसी दाहा पधरा वर्षे कार्य प्रयोजी कसबे मजकुरी देशमुखाचे घरी दुसरी घटिका घालीत होते त्या वर सोमोवानायक विज्यापुरास गेले साडेतीन वर्षे होते तेव्हा वामन जोसी व अनत जोसी नाइका बरोबर गेले त्याणी नाइकाचे आर्जव बहुत च केले त्याणी च्यार सहस्र लारी नायकास रीण दिल्ह सोमोवानायक कृतकार्य होऊन प्रभावलीस आले मग कोणएक प्रसगी मामलेकर जोसी या पासून नायका जवल अतर पडिले त्या वर नायकाचे व जोसीयाचे वैमनश्य जाहले मग नायकी गण जोसी यास रागे भरून सागितले जे आमचे घरी तुजला पच्याग देखील वाचावयास प्रयोजन नाही मग तो विषादी बहुत च जाहाला त्या वर सोमोवा नायकी आपले पुत्र विठल नाइक याची मुजी सगमेश्वरी केली तेव्हा मामलेकर जोसी आला नाही ते प्रसगी वामन जोसी व अनत जोसी याणी सोमोवानायकाची प्रार्थना केली जे आपण तुमचेथ१ (१ तुमचे + एथे = तुमचेये) सर्वकाल आहो स्वामीनी आपल्ये घरी ज्योतिषपणाचा मान आपणास द्यावा त्या वरी नायकी वामन जोसी व अनत जोसी यास सागितले जे मामलेचे जोसी दुसरी घटिका घालीत होते ते घटिका तुह्मी घालणे व गणपतीपूजन घेणे ऐसे नायकी सागितले त्या पासून कसबेचे जोसी दुसरी घटिका घालिताती पूर्वी त्या उभयताचा कलह जाहाला नाही विठलनाइक याचे वेलेस मामलेकर जोसी याणे सगमेश्वरच्या देशमुखाचे घरचे घटके विशई उपाध्ये व जोसी यासि पाच सात वर्षे कलह बहुत च केला की देशमुखाचे येथे आपली च घटिका ह्मणोन उपाध्ये व जोसी यासी प्रभावलीस नेविले हाते मग विठल नायकी उपाध्येयासी मामलेकर जोसी याचा कथला च नाही ह्मणोन उपाध्यास निरोप घरास जावयास देविला मामलेकर जोसी व कसबेकर जोसी या उभयताची समजाविसी आपण करिता ह्मणोन दिवाणातून सोडऊन आणविले समजाविसी करीत होते परतु दोघे समजत ना मग नायकी घटिका अमानत केली मागती याचा कलह वारावा तो विठलनाइक शात जाहाले येका वर्षान मामलेकर गण जोसी हि शात जाहले त्या वर तो कलह तैसा च राहिला पुढे मामलेकर जोसी सगमेश्वरास कार्यप्रयोजनास आले नाहीत त्या उपर केशव नायकी रगोवा नायकाची मुज व सोनाबाईचे लग्न सगमेश्वरच्या घरी केले आपाजी बलाल यासि दिल्ही आपण कन्यादान केले तेव्हा उपाध्ये व जोसी या करवी दोन घ (टिका आणविल्या?) आलीकडे रगोबा नायकी आपले पुत्राचा ++++++ सगमेश्वरी केला त्या पासून कसबे सगमेश्वरी घटिकेचे प्रयोजन जाहाले तरी जोसी उपाध्ये दोन घटिका घालीत आहेत रगोवानायकाची कन्या मनुबाईचे लग्न सगमेश्वरी जाहले राजश्री कृष्णाजी आपाजी नाफडे यासी दिल्ही तेव्हा उपाध्ये जोसी याणी दोन घटिका घातल्या जोसी याणी उपक्रम केला होता की कालसाधना आपले घटिकेवरी करावी लग्नपूजा दोघास द्यावी ऐसे बोलत होते मग कृष्णबाई याणी प्राचीन स्तीत सागितली जे हा कालवर सगमेश्वरी आपले घरी दोन घटिका चालिल्या पूर्वी उपाध्ये गोलवलकर व मामलेदार अनत जोसी व गण जोसी घटिका घालीत होते विठलनायका आलिकडे उपाध्ये गोलवलकर व कसबे सगमेश्वरचे जोसी ऐसे दोन घटिका घालितात ऐसे सागितले त्या वरून मनूच्या लग्नात दोन घटिका घातल्या खेडेगावी देशमुखानी काय केले तरी उपाध्ये गोलवलकर याची येक च घटिका चालत आली आलाकडे बचीचे लग्न सगमेश्वरी जाले तेव्हा उपाध्ये व जोसी याचा प्रथम कलह जाला तेव्हा राजश्री कृष्णाजी भास्कर याणी उभयतास निराले ठेऊन सप्रे पुराहित या करवी घटिका घालविली दादोबा व अतोबा याच्या मुजी कुल्यात जाहाल्या तेव्हा घटिका उपाध्येयाची च घातली या प्रोl पुरातन स्थीत चालत आली आहे ह्मणोन विष्णुभटी करीणा लिहोन पाठविला व तिमाजी कृष्ण याणी हि या च प्रोl सागितले व पुतभट व वासुदेवभट सप्रे याणी तीर्थरूपाचे मुजी पासून याच प्रोl करीणा सागितला ऐसे आजीवर चालत आले आहे पूर्वी उभयता मध्ये कलह जाहाला नाही बचीचे लग्न जाहाले तेव्हा मात्र कथला जाहाला ऐसियास पुढे कथला न व्हावा व कलह तुटावा या निमित्य बाल जोसी सौदागर व सदासीव जोसी यासि ठेऊन घेतले त्यास बाल जोसी याणी कथला निमित्य सदासीव जोसी यास टेऊन आपण निरोप घेऊन गेले विष्णुभटाचे पत्र यावयास विलब लागला ह्मणोन सदासीव जोसी याणी चऊ दिवसाचा नेम करून पत्र लेहून देऊन घरासि गेले त्यास व इतर जोसीयास दोन चार वेल लिहिले परतु ते हजीर होत ना सदासीव जोसी विशालगडास गेले ऐसियास पूर्व वर्तमान मनास आणिता जोसियासि सदरहू घटिकेचा कलह तुह्मासी करावयासि सबध नाही तुह्मी पुरातन कसबे मजकुरी आमचे घरी घटिका घालीत आले आहा हा सर्वाचे मते आहे याप्रोl तुह्मी कसबे मजकुरी आमचे घरी घटिका व ग्रहपूजन व नूतन पच्याग चालविता त्या प्रोl चालवणे ये विसी हे पत्र तुह्मास दिल्हे असे जाणिजे तुह्मी ये विसी चित उद्विग्न न करणे मोर्तब आहे

दस्तुर सोमाजी नरसी करकरे