Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १४
१६२९ वैशाख शुद्ध ११

श्री आईआदिपुरुष

श्रिया सह चिरजीव राजमान्य राजश्री आपास परसराम त्र्यबक अनेक आसीरवाद उपरि येथील कुषल जाणून स्वकीय लिहिणे विशेष राl गणोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली व मामले दाभोल यासी व सरदेशकुळकर्णी मामले प्रभावली व सरदेशमुख ताl खिलणा याणी व वरकड वतनदार देसक मामले प्रभावली याणी कस्ट मशाखत करून मोगला कडे विशालगड असता निष्टेस अतर केले नाही उदितसिग ताब्राचे निसबतीने विशालगडा वरी होता त्याजपासून किला आपले स्वाधीन करून घेऊन राजश्री स्वामीचा किला स्वामीस नजर केला निष्टेस अतर केले नाही या करिता यास हकाची तिजाई माफ केली असे तुह्मी तिजाईचा तगादा न देणे जाणिजे छ ९ सफर जाणिजे लोभ१  असो देणे हा आशीर्वाद