Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७] [१६१७ फाल्गुन शुद्ध १३
श्री
+++ ठाणे ताl चिपुलण ताहा खोतानी देहाय सुहुर सन सीत तिसैन अलफ राजश्री छत्रपती स्वामीचे आज्ञापत्र सादर शके २२ युवानामसवत्सरे माघसुधत्रयोदशी सौम्यवार छ १० रजब सन सीत पैवस्ता छ ७ साबान साल माlर तेथे आज्ञा की राजश्री१ रंगोवा नाईक ह्मणउन राजपत्र सादर जाहले यासि राजश्री पतअमात्यस्वामिचे आज्ञापत्र सादर छ ११ रजब सनसीत पैवस्ता छ ७ साबान साल माlर तेथे आज्ञा की राजश्री रगोवानाईक बिन केशवनाईक सरदेसाई यास सुभा प्राl मजकूरचे सरदेशमुखी वतन याचे दुमाळे केले असे त्या च राजमुद्रेचेवृतिपत्र व तुह्मास सनद सादर आलाहिदा आहे तेणे प्राl वतन याचे दुमाले करून याचे हाते सरदेसमुखीचा कार्यभाग घेत जाणे यास वतन इनाम गाव दोनी व हक सालीना लारी १२५०० साडे बारा हजार लारी व लवाजिमा मोईन प्रमाणे करून दिली असे त्यास प्रस्तुत इनाम गाव दोनी व लवाजिमा राजमुद्रेचे सनद सादर आहे तेणे प्राl चालवणे हकाची मोईन सालीना लारी १२५०० साडे बारा हजार लारी प्राl प्रस्तुत पाववावे तरी मुलूक खराब जुजवी वसाहत आहे या करिता प्रस्तुत हक पाववावयाची मोईन ऐसी केली आहे साल दर साल नख्तबाब देखील खड गैरमहसूल व जिरातीचे दस्त गला व बाजे जिनस व बागाइताचा दस्त याचे नख्त राजश्री अनाजीपताचे कारकीर्दीच्या निर्खाच्या धारिया प्राl नख्त होईल ते ऐसे मिलोन एकबेरजी सुबे मजकुरीचा आकार होईल त्या पैकी लवाजिमा मोईन करून दिली आहे त्या मध्ये दस्ती बाबा आलय आहेति त्याचे दस्त वजा करणे
मोहतर्फा १ बाजार आठवडियास जकात जाबजा त १ जकात उभा मार्ग १
मिठागर किसमीठ १ दस्त भरतो त्यास होईल ते १ आले हलद १ उसाचे दस्त १ सिगोटी १
गादी तबाकू १ कोंबडीपटी १
एकून अकरा बाबेचे दस्त होईल ते वजा करून बाकी बेरजेस दर सदे लारी १l. सवा प्राl सुबा माlरी हमदारीची जमा होत आहे त्यापैकी पाववीत जाणे असल पत्र भोगवटीया बाl माlरवलेस परतून देणे ह्मणऊन सुभा आज्ञापत्र सादर जाहाळें त्या वरून सुभाहून माहाली सनद सादर पौl छ ११ साबानी जाहाळे त्यास देहाय मजकुरी सदरहू प्रमाणे पत्र सादर करून हक व लवाजिमा पाववावयाची मोईन करून दिली असे ऐसीयासि देहाय मजकुरी हकलवाजिमा जे बाबा असेल ते सदरहू मोईन प्राl पाववीत जाणे राl छ ११ साबान मोर्तब सूद१