Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १३३

श्री
राजमान्य राजेश्री रामभट बुधकर अग्रहार मौजे ब्रह्मपुरी गोसावी यासी

स्नेहाभिलाषी श्रीकराचार्ये पडितराय नमस्कार उपरी मौजे ब्रह्मपुरी अग्रहार येथे आमचे अश जमीन । पाव चावर आहे त्याचे लागणी काय जाली आहे उत्पन्न अल्पस्वल्प काय होते हे काही तुह्मी लिहून पाठवीत नाहीत हे तुह्मास उचित नव्हे जे काय थोडे बहत उत्पन्न होईल ते आमचे आह्मास प्रविष्ट करीत जाणे व बाळभट सिराळेकर याचे नेमणूक आश अग्रहारीचे विभागाच्या जाबित्यामध्ये खडी १४ येक खडी आहे त्याचे दामाशाही पावीत जाणे व जाबित्यामध्ये मोरेश्वरभट व कासीभट या दोघाच्या असामी आहेत त्याचा आश जो नेमिला आहे त्याचे ही दामाशाई प्रा। आश पावीत जाणे या उपरी रा। वीरेश्वरभट गिजरे याणी आह्मास गोष्टी विचारिली त्याविषई वीरेश्वरभटापासी सागितले ते मुखवचने सागतील विशेष काय लिहिणे लोभ असो देणे हे नमस्कार
शुभ भवतु