Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १३५

श्री

वेदमूर्ती राजश्री गोपालभट बिन रुद्रभट गिजरे वास्तव्य कसबे क-हाड स्वामीचे शेवेसी

सेवक कालोजी बिन सोमाजी भोसले सा। दडवत विनति उपरी क-हाड क्षेत्रीचे तुह्मी आमचे तीर्थपुरोहित आमचे वडिलाचे लिहिले तुह्मापासी होते ते लिहिले तुह्मापासून गेले तुह्मी आह्मापासी येऊन त्या प्रमाणे सागितले की वडिलाचे लिहिले आह्मा पासून गेले आहे त्यास मनास आणिता तुह्मी आमचे तीर्थपुरोहित ऐसे जाणून तुह्यास पत्र लिहून दिल्हे असे तुह्मी आमचे पुरोहित आमचे वौशीचे देऊन येतील ते तुमचे पूजन करितील यासि अतर नाही तुह्मास दरसाल वरशासन, रु॥ १० बाब देऊ जे आसीर्वाद देऊन सुखरूप राहणे बहुत काय लिहिणे हे विनति