Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २८२ श्री १६२९ माघ शुध्द ५
तहनामा चिरंजीव राजश्री शिवाजीराजे यांसी प्रती राजश्री शाहूराजे यानी लिहून दिल्हा सु॥ समान मया व अलफ राज्याभिषेक शक ३४ विरोधिकृत संवत्सरे माघ शु ५ ई॥ अरुण महान संगम दक्षण तीर कुल दुतर्फा मुलख दरोबस्त, देखील ठाणी व किल्ले तुह्मास दिल्हे असेत.......कलम
(१) ई॥ वारणा नदी उत्तर तीर व वारणा व कृष्णा या संगमा पासून तहद् निवृत्तिसंगम तुंगभद्रा पावेतो उत्तर तीर दरोबस्त, देखील गड ठाणी, व मिरज प्रांत, व विजयपूर प्रांतीची ठाणी, दरोबस्त देखील नद्या तुह्मा कडील अंमल व ठाणी असतील तीं, आमचे स्वाधीन करावीं.......कलम
[१] वारुणा व कृष्णा संगमापासून दक्षण तीर तहद निवृत्तिसंगम तुंगभद्रा पावेतो दरोबस्त, देखील गड ठाणी, तुह्मास दिल्ही असेत........कलम
[२] कोंकण प्रांत साळसी अलिकडे तहद पंचमहाल अकोलें पावेतों दरोबस्त तुह्मांकडे दिल्हे असेत..........कलम
[३] सेवक लोक लहान मोठे सुध्दा दरोबस्त याणी आजवर आज्ञेत लागू हुकुमानी चाकरी केली त्यांसी मागील अपराध मनात न आणता येथून पुढे मात्र जिकडील तिकडे चांगले प्रकारे करावे व इकडील बेइमान चाकर तुह्मी ठेवू नये, तुह्माकडील आह्मी ठेवू नये........ कलम
सदर्हू् प्रमाणे आह्मी चालूं. यासी अंतराय होणार नाही. मोर्तब असे शिक्क्याचे.