Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्यास राजश्री साहेब गणेशपंतास सुरनिसी सांगितरी सिवाजीपंतास सासवडचा हवाला सांगितला सिवाजीपंताचे पुत्र रखमाजीपंत होते त्यास किलेहायचा सरसुभा सांगितला आणि आपणाजवळ हुजूर ठेविले विसाजीपंतास कोकणात नसरापुरची माहालीची मजमु सांगितली तेसमई तोरण्याखाले शेणवडी गाव कानदखोराचा आहे तेथे नांदत होते रोजगारामुळे गावावरी पाटिलकी करावयास कोणी गेले नाहीत त्यावरी मोगलाची धामधूम जाली राजश्री राजाराम चंजीप्रांते गेले राजरी शंकराजीपंत राजाज्ञा किले वसंतगडी होते त्याजवळ राजश्री नारो यादव जाऊन पेशवाईची मुतालिकी करून राहिले त्यावरी राजश्री शंकराजीपंतास सुरनिसीचे पद जाले या प्रांतीची + + + केली त्या बि॥ राजश्री नारो यादव रोहिड्यास आले मौजे वोझर हा गाव आपणाकडे इनाम घेतला आणि सनदा घेउन आले ते समई मौजे मा।रचे खणीस मांडे बोलाऊन आणिले तेव्हा पाटिलकीच्या उत्पनाचा व तीन चावर इनाम सेताच्या उत्पन्नाचा तगादा लाविला आजीतागाईत तुह्मी पाटिलकी करीत आले आहा त्याच्या उत्पन्नाचा वसूल देणे ह्मणून तहसीलदार लावत तेव्हा मांड्यानी मजकूर केला की एक चावर इनाम विसाजीपंत याणी विकिला दोनी चावर उरला त्याचा वसूल घ्यावा ह्मणून बोलिले त्यास राजश्री नारो यादव याणी आपली मातुश्री भवानीबाई यास वर्तमान पुसिले त्याणी जाब दिल्हा जे तुह्मी पाटिलकीचे उत्पन मागता ऐसे च पेशजीच्या उत्पनात सातसे टके घेऊन घरास आले इनाम चावर विकिला नाही माडे विकीले ह्मणताती तरी त्याच्या दस्तूरचे पत्र आणवणे ऐसी बोलिली त्यावरून माडे खोटे जाले याकरिता किले राजगडी अटकेत ठेविले एक वरीस किलियावर होते त्यापासून काय घेतले हे कळले नाही त्याउपरी राजश्री शाहूराजे या प्रांते आले राजश्री बाळाजी विश्वनाथ यास प्रधानपद जाले त्याजकडून राजश्री हरि यादव याणी हुजूरचा सुभा केला तेसमई देशमुख व देशपांडे व गावगनाचे मोकदम व बाजे वतनदार जमा जाले तेव्हा गोताजवळ मजकूर घातला की मौजे वोझरची पाटिलकी आपली असता मांडे काय निमित्य खाताती याचा इनसाफ गोतमते करणे त्यास मांड्यानी जाब दिलहा जे तुमची पाटिलकी जुनरच्या फौजदारास दीड हजार रुपये घेऊन विकली आहे आपणास काल पडिला याकरिता विकली त्यास ते बोलिले जे त्यास नकळत वतन नविकले ते निगाड तुह्मी वारावे पाटिलकीसी तुह्मास संबंध नाही ऐसे गोताने बोलो + पाटिलकीचा महजर राजश्री हरिपंतास करून दिल्हा त्याणी गावात कारभारी ठेऊन पाटिलकीचे वतन चालवीत आहेत त्यास राजश्री नारो यादव व हरि यादव याणी आपणास पुसिले की वडिलाचे वतन सोडवावे परंतु आपल्या विभागास अल्प वाटा येतो तेसमई आपण उत्तर दिल्हे जे अह्मी तो गोसावी अमचा वाटा निमे आहे तो तुह्मी खाऊन पाटिलकी करा त्यास हरिपंत बोलिले जे तुह्मास पुत्र होईल तो वाटा निमे मागेल तेव्हा आपण बोलिलो जे पुत्र होऊन वाटा मागावया होय तो परयंत तुह्मी खाणे पुत्र जालियावरी एक भाकर दो ठाई करून समाधाने खाणे परंतु वतनाचा जिर्णोधार करणे ऐसे बोलिले त्यावरून त्याणी राजश्री बालाजीपंत प्रधान यापासी पाटिलकीचा करीणा विदित करून महजर करून घेतला ते समई त्यास काय काय खर्च जाला तो त्याणी आपणास सांगितले नाही त्यावरी राजश्री हरिपंत बोलिले की तीन सहस्र रुपये वतनास खर्च जाला तो वाटणीप्रमाणे अवघ्यानी घ्यावा तेव्हा आपण जाब दिल्हा की आमचा वाटा खात च आहा त्याउपरी आपणास जिउबा पुत्र जाला त्याच्या व्रतबंधास हरिपंती दाहा रुपये दिल्हे त्यावरी काही न पावले त्यास देवज्ञा जाली त्यावरी त्याच्या पुत्राने जिउबाच्या लग्नाच्या रिणास पांच रुपये दिल्हे