Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
एणेप्रमाणे दोग पुत्र आहेत त्याउपरी रुद्राजीपंत धाकटे गोपजीपंत यास पुत्र मोरोपंत त्याचे पुत्र गोविंदपंत त्यास सतान नाही एणे प्रमाणे वंशावळी आहे त्यास पाटिलकीचा करीणा पाटिलकीचे गावी असता मलिकअंबर दिवाण निजामशाहा पातशाहा याणी मेहेरवान होऊन गणेशपंतास सरकार जुनरची खालिसा अंंमलाची करोडगिरीचा व्यापार सांगितला त्याणी पाटिलकीस गुमास्ता मकाजी माड्या ठेविला तो पाटिलकीचा कारभार करीत असे गावात पाटिलकीस इनाम पातशाहानी गणेशपंतास तीन चाहूर जमीन मोजे वोझर येथे इनाम दिल्ही त्याचे उत्पन व पाटिलकीचा मानभाग गणेशपंत अनभवीत होते त्यावरी सरकार जुनरचे देशमुख व देशपांडे व मोकदम पातशाहानी हुजूर बोलाविले जमाबदी करून रयतीस दिलासीयाचे कौल दिल्हे सिरपाव दिल्हे ते समई वोझरचा पाटील बोलाविला तेव्हा गणेशपंती मांड्या गुमास्ता होता त्यास सिरपाव देविला त्यास मांड्या गावास आलियावरी निमेचा पाटील ह्मणऊ लागला तेव्हा कटकट होउुन हुजूर दोगजण खडकीस पातशाहाजवल फिर्यादीस गेले तेव्हा पातशाहानी गणेशपंतास पेचिले की पाटिलकीस सिरपाव तुह्मी घ्यावा तो गुमास्तियास काय बदल देविला ऐसे पेचिले त्यावरी गावास आले मांडे निमे पाटिलकी करू लागले त्याणी दावा लाविला गणेशपंताच्या देव्हारा सोनयाची एक सेराची गाय व पाव सेराचे वासरू पूजीत होते ते घरीचे बटिकीस फिताऊन चोरून नेले त्यावरी गणेशपंती उपोशणे आरंभिली तेव्हा श्री देव गणेशमूर्ति मौजे मजकुरी आहे त्याणी स्वप्न दाखविले की तुझी सोन्याची गाय व वासरू तुझे बटिकीने चोरून नेली त्यास बटिकीस मार देता कबूल जाली आणि मांड्याचे घरीहून सोन्याची गाय व वासरू आणून दिल्हे त्यावरी बहुत द्वेश वाढला त्यास गणेशपंत सध्या करीत होते तो समय पाहून मांड्यानी वाडियात येऊन गणेशपंतास जीवे मारिले त्याचे पुत्र किटोपंत आले बेल्हेतर्फेची कमावीस करीत होते त्यास हे वर्तमान कळता च खडकीस पातशाहाकडे गेले मागे बहिरोपंत श्रीनरहरीचे मूर्ति घेऊन कोकणात कल्याण प्राते गेले मारियाचे वर्तमान किटोपती मलिकअबर साहेब यास विदित केले त्याणी बफजल हुकूम व जमाव समागमे दिल्हा त्याणी वोझरास येऊन माडे दावणी देऊन मारिले व त्या फितव्यात होते ते हि मारीले व त्याचे घरी वाटसरू राहिले होते ते देखील मारिले तेसमई माड्याची बाईल गरोदर होती ते माहेरास पळोन गेली तेथे प्रसूत जाली तिजला दोगजण पुत्र जाले किटोपती व्यापार के + + तेथे गेले माडे पाटिलकी करू लागले त्यावरी + + बाप विसाजी बहिरदेव जुनरास जाऊन देसमुख देसपांडियास भेटोन माड्यासी वाद सांगितला पाटिलकी खरी केली मांड्यानी पाटिलकीचे व इनामाचे उत्पन खादले होते त्या ऐवजपैकी सातसे टके घेतले गावावरी राहावे तरी आपले भाऊ परागंदा जाले याकरिता गावावरी राहिले नाहीत पैका घेऊन घरास आले त्याउपरी राजश्री सिवाजीराजे भोसले राज्य करू लागले त्याच्या दरशनास आपले चुलते गणेशपंत व सिवाजीपंत गेले