Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२१
ठ पंढरीपूरपती रुकीमणीराराध्यमानचरण स्वराज्यछव्ये अमरगणवीज्यमान चामरद्वय श्रीमत पांडुरंगचरणस्वरोरुहुयुयुगुलाराधनतत्पर द्विजभग्तीपरायण परउपरकारैकसिंधु दानाध्रीकृतकर्णयशोढवलीकृतदिगमंडल रायराजमान्य माहाराज राजश्री महीपतिराय स्वामिवर्य गोसावियासि आश्रित बडवे उतपात व पुजारे व बेणेराय व डिगरे व परिचारक व हरीदास व डांगे व दिवटे समस्त ब्राह्मण क्षेत्र त्रिकाळ धूपार्ती समई वेदोक्त अनेक आश्रीवाद विनंति उपरी माहाराजाचे निरंतर स्मरण करीत आसो कल्याण अभ्यउदय व उदंड भाग्य अबऊश व आरोग्य व गजांती लक्ष्मी परमेस्वरांजवली निरंतर मागत असो तदुपरि याउपरि स्नानसंध्या करून तुह्मास आश्रीवाद देत असो तदुपरि माहाराजचे कृपेकरिता आह्मी माहाराजे कारकुनास आग्न्यापत्र लिहिले की देवालामधे नरसणानाईक देगावकर इही देवलामधे धर्मकृत करिताती तेथे जोतिशाचा जो काय अधिकार आहे तो तो अमानत करून ठेवणे तरी हे जे काही माहाराजापासी मालुमाती जिही केली आहे त्यास देवालामधे जोतिशास समंध नाही देवलातील जोतीश व उपाधीक वर्त उद्यापन होम हवन आवघे बेणेरायचे आसे ताटे थिटे आराध्यास समंध नाही आणि देवालामधे लग्ने मुहुर्ते होत आहेती व राजश्री कृस्णाजीपंतास मोकासा माघे अस्ता देवालामधे आस्वताचा वृतबंध केला आहे तेथील अधिकार उपाधीक व जोतीस वेणेराये घेतले व माघे देवालामधे होम हवने जाहाली आहेत ते हि अधिकार बेणराय घेत गेला आहे ऐसे परंपरा चालत आले अस्ता माहाराजेचे वर्तमानी ऐसा अर्थ होत आहे येणेकरिता ब्रह्मणाचे वीर्तीचा उछेद होतो तरी हे माहाराजे नवे अर्थ न करणे येविशई देवलाती अर्थ जो माझा ह्माण असल त्यास माहाराज देवस्थान आवघे देणे आह्मी माहाराजापासी आवघे येतो माहाराज धर्मपरायण आहेती नवा अर्थ होय ऐसे न करणे बहुत लेहू तरी माहाराज सर्वज्ञ असती जे अग्न्या ते सिरसा कृपा निरंतर असो देणे हे विनंति देवलातील अवघा पदार्थ जोतीस उपाधीक बेणेरायाचे अस्ता यासी वादी कोण्ही सदरेस उभे राहात नस्ता कारकून बेणेरायचपासी कतबे लेहून घेत आहेती आमचे वाय जात नाहीत स्वामीस सृत असावे हे विनंति रघोव बडवे
स्वहस्त सिदोबा बडवा