Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१९
(एक बंद गहाळ)
भानो तुकदेव व मोकदम मौजे सीरबाव
हे मुख्य करुनु समस्त देसक व समस्त माहाजन क्षेत्र पंढरपूर प्रा। माणदहीगाऊ याविदमाने जाहाला माहाजर ऐसा जे पुंडलिकभट वेणेराय एणे हुजूर एउनु मालूम केले जे आपण आशढी द्वादसीस पालखी मिरवावियास का +++ ते जे उतपन होते ते आपण घेतो ऐसे चालिले असता देवाचेया समरपिलिया विडियास बडिवियाने हात घातला तेधवा एणे दोही दिधली ते दोही मोडुनु विडा नेला त्यास देमू क्रुस्णाजी बडिवियासी व माहाजनासी तलब करुनु ठाणियासी नेले तेथे पूसिले जे हे पालखी व पालखीचे उतपन कोणाचे हे तुह्मी सत्प पूर्वजाचे सुकत स्मरौन बोला ह्मणौनु सेपथ वा गळहोड देवाचे घातलेयाउपरि समस्त माहाजन व सेवकवर्ग आपले सुकत स्मरौन बोलिले जे हे पालखी व पालखीतील उतपन वेणेराय नेताती ऐसे परंपरागत चालिले आहे देव भद्रीहून उठिला त्यास समरपिले जे ते वेणेराय घेताती वेणेराय चालता बडवा देवभद्री असता बडिवियाचे जे समरपिले पदार्थ ते च बडिवा घेतो एणे रीती परंपरागत चालिले आहे एसे साक्ष वदिली याउपरि क्रुस्णाजी बडिवियास तू गहजोरी करितोस ह्मणौनु होनु २०० दोनी से बांधले तेधवा क्रुस्णाजी बोलिला जे हे मुलेलेकरानी केले आपण करविला नाही हे आपणास विदित नाही त्याउपरि समस्त देसक व माहाजनानी साहेबासि आहोस करुनु पैके होनु २०० दोनी से हे माफ करिविले त्यावरी तेणे विडियासि हात घातला होता त्यासि होनु १० दंड घेउनु पुंडलिकभटाचा विडा पुंडलिक भटासि दिधला आता जो कोण्ही याचे पालखीस व उतपनासी हरकती करील तो दिवाणासी होनु दोनी से २०० देईल एणे प्रमाणे निवडिले आहे हा माहाजर सही