Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २१२ १६०९ वैशाख शुध्द ३
सके १६०९ प्रभव नाम संवत्छर वैशाख सुध त्रितीया आदितवार सु॥ सबा समानीन अलफ सन हजार १०९६ कारणे राजश्री त्रींबक काकाजी व राघो काकाजी यासि होनाजी बाबाजी व नागोजी बाबाजी देशकुलकर्णी का। सांगोला पा। माण लेहून दीधले पत्र ऐसे जे आपणास काल कठीण पडिला व पाठी कोन्ही नाही यास्तव तुह्मापासून आत्मकार्य लागी घेतले होन ५०० पाचसे घेऊन तुह्मास कर्याती सांगोलाचे देसकुलकर्णाचे तकसीम चौथी दिल्ही असे बितपसील ऐन कुलहक होन ४५ पंचेतालीस पैकी चौथाई होन ११।. सवा अकरा पैकी गाऊ तोडून दिल्हे बितपसील
३ मौजे वाडेगाऊ ३ मौजे सोनद
२ मौजे चिचाली १ माणेगाव
१ पेठ वजीराबाद होन १। मडसिंगे होन २ पैकी
------ ------
६ ५।
एकूण होन ११। सवा अकरा व कसबे सांगोलेचे इनाम चावर .॥१२॥. पैकी बाग बिघे १२॥ व जिराती चावर नीम ॥. पैकी चौथी तकसीम बिघे १८ यासि बाग बिघे ३ व जिराती बिघे १५ तुह्मी खाऊन सुखे असावे व सदरहू गावी मोढे आपल्या गावा घाले आपण खावे दर मोढेस मीठ .।. होन .।. द्याल प्रा। घेत जाणे व दर गावास जुतेजोडा १ व बाजार पेठ वजीराबाद घेत जाणे व वृत्तीमुले का। मजकुरी जे उपेद्र होईल ते चौथे ठाई वाटून देऊ व वृतीमुले टका पडेल तो चौथे ठाई तुह्मी द्यावी व नवी वृत्ती जे साधेल ते तुह्मास आह्मी निमे देऊ त्यासी जो काये टका पडेल तो तुह्मी द्यावा व रान होऊन काठ व बाजे हक जो येईल तो चौथेठाई वाडून देऊन सदरहू प्रमाणे लेकराचे लेकरी खाऊन सुखे असणे यासि अनेथा करू तरी आपले कुलस्वामी साक्ष व वडिलाचे सुकृत साक्ष असे सदरहू लिहिले प्रमाणे ठाणाचा महजर करून देऊ हे लिहून दिल्हे पत्र सही आपला कोन्ही भाऊबद मुजाहीम जालिया आपण वारूं हे लिहून दिल्हे सही
बी॥ होनाजी बाबाजी व नागोजी
बाबाजी देसकुलकर्णी
गोही
नागोजी बिन रताजी माने देसमुख
का। ह्मैसवड पा। माण-दहीगाऊ
सायेवडे देसाई का। नाझरे पा। माण
अताजी माने मोकदम का। वेलापूर
अताजी बिन मानाजी माने देशमुख
पा। वेलापूर पा। मान दहीगाऊ