Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २०८ १५५६ कार्तिक १५
अज रखतखाने खुदायवंद मा। सर्क मा। इतबारनमुलूक खुलीदयामदौलतहू बजानीब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि ता। महु + + सु॥सन खमस अर्बैन व अलफ बा। खुर्दखत हजरती साहेब छ १७ रबिलाखर नरसींहभट बिन नारायणभट सो। पंढरपूर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक १ दर सवाद मौजे देगाव ता। मा। प्रज कुसूबडा सटवाजी फर्मान भोगवटे मुकासाइयानि सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती चालिले आहे फर्मान व भोगवटेयाचे कागद होते ते जलाले व आपण दुकलाकरिता कासीस गेलो होतो त्याकरिता तसरुफाती अजी तागाईत नाही हाली आपण कासीहून आलो तरी खैर साहेबाची आहे साहेबी मेहरबान होउनु सदरहू इनामबाबे हुकूम फर्माविला पाहिजे की सदरहू इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असेल तेणेप्रमाणे दुमाले करणे दरम्याने भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटेयाचे कागद जलालेयाचा उजूर न कीजे ऐसा हुकूम केला पाहिजे ह्मणउनु मालूम केले तरी भटमा। सदरहू इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे देगाव ता। मा। प्रज कुसुवडा सटवाजी बा। फर्मान व भोगवटा मुकासाइयानी कारकीर्दी दर कारकीर्दी चालिलेप्रमाणे बरहुकूम गावीचे पटेलास व मोखतसर कुणबियास व गावीचे बुढे बुढे कुणबियास पुसौनु गहदम चालिले ऐस कुणबी सागतील तरी सदरहू दुमाले कीजे दरम्याने भटमजकूर कासीस गेला होता त्याकरिता भोगवटा तुटला त्याची इस्कील न कीजे व फर्मान व भोगवटेयाचे कागद जलाले त्याचा उजूर न कीजे दर हरसाल खु॥ उजून न कीजे तालीक घेउनु असेली फिराउनु दीजे कदीम इनामती तजकिरा पाहौनु गावीचे मोकदम व कुलकरणीयास बरवे रीती पुसौनु इनामा इनामाची पाहौनु येणेप्रमाणे खूब मनास आणौउनु पेसजी कारकीर्दी मलीकअबर चालिले असेल तेणेप्रमाणे चालवणे ह्मणौउनु सादीर आहे तेणेप्रमाणे चालवणे पा। हुजूर पा। मोर्तब सूद
रुजु सुरुनिवीस
तेरीख १३ माहे रमजान
रमजान