Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६.
१७०१ कार्तिक वद्य ५. श्री. २८ नोव्हेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो।।. हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल त॥ छ १९ जिल्काद जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पो। तें पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. मुहूर्तेंकरून निघालों, राजश्री नरसिंगराव व गोविंदराव यांची वाट पाहातों, आले ह्मणजे निघोन जाऊं, ह्मणोन लि॥ तें कळलें. त्यास, तुह्मीं गेल्यावर नरसिंगराव व गोविंदराव व राजश्री पाटीलबावाकडील कारकून यांची रवानगी जाली. त्यास, श्रीमंत राजश्री नानांनीं समक्ष सांगितलें कीं, सरकारचे मातबर कृष्णराव दिल्हे आहेत, हे व तुह्मीं मिळोन जाबस्वाल करीत जाणें. कोठें दरज न दिसे, असें करावें. याप्रों। सांगितलें आहे. तुह्मीं सर्वांस मेळऊन घेऊन, जाब स्वाल करीत जावें. आजपर्यंत नरसिंगराव आदिकरून सर्व मंडळीची गांठ पडली असेल. याउपरी दीसगत न लावितां लौकर जाऊन पोहोंचावें. बहुत काय लिहिणें? लोभ असों दीजे. हे विनंति.
पो। छ २६ जिलकाद, सन समानीन.