Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक २.
१७०१ आश्विन शु॥ १२ श्री. २२ आक्टोबर १७७९.
दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान त॥ कमाविसदारान व चौकीदारान व बाजेलोकान व मोकदमान व नावाडे व ठोकरेकरी. सु॥ समानीन मया व अलफ. राजश्री कृष्णराव नारायण जोशी सरकारांतून हैदरखानाकडे रवाना केले असेत. बरोबर पालखी व घोडीं व उंटें व माणसें गाडदी व राउत भारबारदारी आहे. तरी जातां येतां मार्गीं मुजाहीम न होणें. रात्रीस चौकी पाहारा करून नदी नाले पार करणें. जाणिजे. छ ११ सवाल. आज्ञा प्रमाण. लेखनसीमा.