Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

                                                                                 लेखांक ११२.                                                      
१७०२ वैशाख शु.१२                                                        श्री.                                                                   १५ मे १७८०.                                                                                 

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पे।। बाळाजी जनार्दन सां।। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं चैत्र वद्य १ पत्रें पाठविलीं, तें वद्य त्रयोदशीस पावलीं. दोन चार पत्रें पाठविलीं उत्तर येत नाहीं; नवाबसाहेब हमेश विचारितात, यास्तव पत्रें वरचेवर येत असावीं. नवाबसाहेब यांणीं ऐवज सावकाराचे पदरीं घातला. आपण खासा शुद्धपक्षीं निघणार होते; परंतु चिरागांचे दिवस, सबब वद्य त्रयोदशीस निघावयाचा नेम केला आहे. इंग्रजांचे तंबीचा शोक मोठा. श्रीमंताकडील लक्ष मनःपूर्वक आहे. एक वेळ वचन केलें, इथःपर लोक नानाप्रकारें समजावितात, परंतु खातरेस आणीत नाहींत. आपले वचनाचे कायमीवर श्रीमंताचे दौलतीची तरकी व्हावी, दुषमानास नसीयत घडावी हेच अपेक्षा आहे. राव सिंदे यांजकडील पत्र जलद येऊन पावलें ह्मणजे आमची रवानगी करून नवाबसाहेब मसलतीवर नमूद होतील, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास तुमचीं पत्रें आलीं, त्यांचीं झाडून उत्तरें व इकडील मजकूर नवाबबहादर यांस कळावा ह्मणोन पेशजींच पत्रांचे जाब देऊन रवानगी केली, तें पत्रें अलिकडे तुह्मांस पावलीं असतील. सावकाराचे पदरीं ऐवज घातला, फार चांगलें. नवाब बहादूर बो(ल)ल्याप्रमाणें निभावतील, ही खातरजमा आहे. शुद्धपक्षीं निघोन मसलतीवर जाणें होतें ह्मणजे फार ठीक पडतें. इंग्रजांस ताण बसता. त्यास चिरागामुळें राहणें जालें. असो. वद्य त्रयोदशीस निघाले असतील. कदाचित् नसले निघाले तरी, याउपरीं त-ही जलद दरमजल चेनापट्टण तालुकियांत जाणें घडावें. सरदार व सरकारच्या फौजा जाऊन लढाई दररोज शुरूं आहे. भोंसले कटकच्या सुमारास गेले. इंग्रजाचे तालुकियांत शिरले असतील. अशांत नवाबबहादूर यांजकडून जकड बसावी. सालअखेर जालें. दिवस कांहींच राहिले नाहींत. याजकरितां जलदीचें काम आहे. कदाचित् नवाबबहादूर ह्मणतील, साल झालें, बरसात आली तरी काय मुजाका आहे ? बरसातींतच आह्मीं लाई शुरू करूं. त्यास, हलीं झाडून लढाई गुजराथेंत पडली. चेनापटणचे लोक मदतीस दर्याचे मार्गानें सुरतेस उतरतात. तिकडे नवाबाकडून ताण बसता, तरी लोक मदतीस येऊन पावते. तसेंच गुजराथेंत बरसातींत लढाई चालणार नाहीं. छावणी होईल. ते समईं नवाबबहादराकडील शुरूं जाली, तरी इकडील लोक तिकडे मदत जातील. जळमार्ग मोकळा आहे. यास्तव इकडे लढाई भारी पडली. अशांत नवाबबहादूर यांचे. जाणें जलद होतें, ह्मणजे चहूंकडून एकदांच लढाई पडून आयास येते. सजा पक्की होईल. यास्तव नवाबबहादूर यांणीं फार लौकर जावें, ह्मणजे केल्या कराराचें सार्थक आहे. आणि इंग्रजाचे तंबीचा शोक आहे तो शेवटास जाईल. श्रीमंताचे स्नेहाची तरकी दिनबदिन ज्यादा आहे आणि यांतच नफेही आहेत. राजश्री राव सिंदे यांचें पत्र लौकर यावें ह्मणोन लिहिलें. त्यास, पत्राविशीं फार वेळ सिंदे यांस लिहिलें. इकडून पत्रें त्यांस पावलीं. परंतु तिकडून कागदापत्राचा निभाव होईना. कांहीं जोड्या मारल्या गेल्या. कांहीं हरकारे येतात, ते लुटून सडे येतात. ऐशा अडचणी आहेत. शेवटीं कागदपत्रांकरितां राजश्री नारो शिवदेव यांस बराबर स्वार देऊन पाठवावयाची तर्तूद केली. मशारनिले यांचे घरीं मुंज आहे. दो चौ रोजीं वाईंतून येतील. वैशाख वद्य प्रतिपदेस त्यांची रवानगी. मशारनिले पोंहचतांच पत्र येईल. त्यास अलबत्ता महिना दीड महिना लागेल. पत्र येतांच नवाबबहादूर यांजकडे पोंहचावीत असों. येविशीं खातरजमा असावी. हें पत्र येण्यास दिवसगत लागेल, तोंपावेतों नवाबबहादूर यांणीं तटून न राहतां, जलद मसलतीवर नमूद व्हावें. मोठे मसलतीवर नजर असावी. हे सर्व दरजे त्यांचे खातरेंत आहेत. ल्याहावें ऐसें नाहीं. *मसलतीचे दिवस निघोन गेले. लिहिण्या पुसण्याचखालीं गेले ! एक साल फौजेची सिबंदी सरकारांत चढली. तहनामा जलद मसलतीवर जाणें घडावें ह्मणोन लौकर पाठविला, कीं चोहूंकडून इंग्रेजांस ताण चांगला बसून मसलत चांगली व्हावी. याकरितां गुदस्ताचा ऐवज सोडून मसुद्याप्रमाणें तहनामे पाठविले. त्यास साडेतीन महिने जाले. शेवटीं अखेर साल जहालें. इकडे तर तीन महिने इंग्रजांची व उभयतां सरदारांची लढाई लागल्यास जहाले; व सुरतेकडे वे पणवेलीकडे इंग्रेजांच्या लढाया होऊन इंग्रेज मारले व आरमारची लढाई याप्रमाणें चालल्या आहेत. सिंद्यांचेच पत्राकरितां विलंब लागतो असें असतें, तर यांचें पत्र आल्यावर तहनामे पाठविले असते. असो, याउपर तरी लौकर जाणें घडावें, हें उत्तम. र॥ छ १० जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.

पे॥ छ २६ जमादिलावल. सन समानीन.