Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २२.
नकल
१६००
पहिला बंद फाटून गेला
अज रख्तखाने राजश्री सवाजी राजे साहेब दामदौलतहू तो। पायगुडे व करंजवणे देसमुख व मोकदम व कुलकर्णी व यां कर्याती मावळ प्रा। पुणे सु॥ सन तिसा सबैन अलफ मालूम दानद की मोरो विठल होनप देसकुलकर्णी कर्याती मजकूर हे हुजूर एऊन आपली हकीकत जाहीर केली की, आपली वडीलवडिलांची मिरास देसकुलकर्णी तर्फ पुणे बित॥
ता। हवेली देह ८२ | ता। कर्याती मावळ देह ३६ |
ता। सांडस बु॥ | ता। सांडस खुर्द |
देह २९ | देह २ एकून देह २० |
ता। करेपटार देह ४१ | ता। पाटस देह ४३ |
ता। नीरथडी देह ३७ |
एणेप्रमाणे पिढी दर पिढी कारकीर्दी दर कारकीर्दी देसकुलकर्ण चालत आलें आहे. ऐसीयासि माहाराजसाहेबासी निजामशाह यानीं प्रा। मा। मोकासा दिधला ते वख्ती तर्फतर्फानी माहाराजसाहेबीं ठाणी ठेऊन हवालदार व कारकून तर्फतर्फास सतंतर कमावीस करीत असेती ते वख्तीं आपलेया वडिलीं गुमस्ते तर्फतर्फास कारभारी कारभारास दिधले असतां कर्याती मावळास गुपचुप पुणाहून पाठविले. याणी कितेक दिवस मुतालकी करीत असतां कागदपत्रांचा सिरस्ता आपणाजवळी आणानै देत असेती व हकलवाजिमा आणौन चाकरीचे रबेसीने आपल्या वडिलांसी वर्तत रयतीस बदसुलूख केला ह्मणौन त्यास दूर करून नामाजी लांडा पुणाहून गुमस्तगिरी देऊन कर्यात मावळास पाठविला. नामाजी हयात असतां आपला हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता ऐसे आपणास देत गेला ऐसें माहाराजसाहेबांचे कारकीर्दीस चालत आले असतां निजामशाही गुदरोन गेली. एलिशाही तर्फेने विज्यापुरीहून मुर्हारी जगदेव सुभा एऊन पुणे जाळून लुटून तलाख केलें ते वख्तीं दौलतमंगल उर्फ भुलेश्वर एथें मुर्हारीनें किल्ला साधोन शाहार वसविलें तेथे आपले वडील राहावयासि गेले. कितेक मुदती भुलेश्वरी कारभार पडिला त्याकरितां कर्यात मावळीं नामाजी लांडा कारभार करीत असेती तो आपला हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता देत असे. एलिदशाहीतून माहाराजसाहेबास पुणे मोकासा जाहाले ते वख्ती साहेबांस कर्याती मावळ व राजश्री मंबाजी राजे भोसले यांसि सांडस खुर्द माहाराजसाहेबीं आपणापासून मोकासा दिल्हा. साहेबांचे तर्फेने कर्याती मावळांस हवालदार व कारकून आलाहिदे गेले तयास जागजोरा करून नामाजीने आपणासी बेइनाम होऊन नजर बदलली ऐसीयासि आपण एऊन साहेबांपासी हकीकती जाहीर केली तों निळो सोनदेऊ साहेबांचे मजमूदार त्याणी आपाजीची पाठी राखिली. आपाजीस व आपणासी रुजू होऊन देत नाहीं. तरी साहेबी मेहेरबान होऊन देसमुख व मोकदम व कुलकर्णी व रयतीस ताकीद करून खुर्दखत दिले पाहिजे ह्मणौन तुह्मी मालूम केले त्यावरून तुह्मास बोलाऊन हकीकती पुसिली तुह्मी सदर्हू प्रा। सांगितले. हाली मोरो विठल देसकुलकर्णी यांचे देसकुलकर्णाचा व कर्याती मावळ यांचे देसकुलकर्णाचा अमल यांचे दुमाला करणे आपाजीस दखल न करणे याचा हकलाजिमा यांसि देणे तकरार फिर्यादी एऊ न देणे तालीक घेऊन असल फिराऊन देणे.
एणेपमाणे हककती गुदली तो उदयभान राठवड अज तर्फे पातशाही किलेदार किले कोंढाणा त्याणे छावणी बदल जमीदारानि व मोकदमानि व रयानि प॥ पुणा कर्याती मावळ वगैरे किलेमजकुरी जमा असतां आपाजी बिन नामाजी लांडा हाजीर होता बाबाजीराम देसपांडे ह्मणो लागला की, तुझा बाप नामाजी आपलिया वडिलाचा गुमास्ता कागदाचा सिरस्ता व हकलाजिमा आमचा आह्मास देत गेला आहे, ऐसे असोन फितरतीकरितां आमचा कागदाचा सिरस्ता तुजपासी राहोन गेला आहे तो देणे. त्यावरून हालीमवाली किलेमजकूरी जमा होते त्याहुजून पेशमान होऊन आपाजीने आपल्या बदस्तुरें करंजवणे व पायगुडे देसमुख व मोकदम व मोकदम कर्याती मजकूर यांचे शाहिदीनसी कागद लिहून दिल्हा एणेप्रमाणे :-
श्रीसके १५८१ कीलक नांव सवछरे वैशाख शुध प्रतिपदा तेदिवसी राजश्री बावाजी राम होनपदेसपांडिये प॥ पुणा यास आपाजी नामदेऊ लांडे यानी लेहोन दिधले की आपला बाप नामाजी लांडा तुमच्या वडिली तर्फ कर्याती मावळीची देसकुलकर्णाची गुमस्तगिरी देऊन ठेविला असता तुमचा हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता तुमचे वडिलास देत गेला आहे. आपला बाप नामाजी मरोन गेला त्यावरी आपण तुह्मासी नजर बदलून तुमचा हकलाजिमा व कागदाचा सिरस्ता द्यावा तो दिधला नाही ह्मणऊन तुह्मी आपल्या गळा पडोन आपणास पदरी धरिले ते वख्ती किले सिंहगडीचे छावणीबदल उदेभान राठवड किलेदार त्याणी कर्याती मावळीचे देसमुख करंजवणे व पायगुडे व मोकदम व कुलकर्णी किलियास बोलाविले होते त्यांस आपण दरम्यान घालून आपला अन्याय मागोन घेऊन जैसा आपला बाप नामाजी तुमच्या वडिली गुमास्ता ठेविला होता तेसे आपणास संतोशे ठेवाल तर राहोन दूर कराल तेवख्ती दूर होऊं हे आपले लिहिले सही.
जैतजी करजवणे देसमुख क॥ मजकूर |
दुर्गाजी पायगुडे देशमुख क॥ मजकूर |
कन्होजी धावडा मौजे कोंढ ता। क॥ मा।र |
विसोजी मोझेरा मोकदम मौजे भुकूम ता। मा।र |
रामजी ससर व पिलाजी चायरा मोकदम मौजे वासर |
तावजी विंगळा व माणकोजी चौधा मोकदम मौजे भूगाव |
खेवजी व रेखोजी चौधे मोकदम मौजे आंबेगाव |
सुभानजी व संभाजी पायगुडे मोकदम मौजे वतळबाब कुडीस |
विठोजी पिंजण मोकदम मौजे किन्हई |
सदरर्हूप्रमाणे निविस्ते आपाजी की पिदर मन ब इस्म नामाजी नोकर शुमा बूद मुककिता होऊन गेला तो छावणीचा कारभार दुणावला कर्याती मावळ पडिला त्याचा हि सरबरा बाबाजी राम देसपांडे पा। पुणे यानी करून दिधला. पातशाही अंमलफैला मोरोजी व बाबाजी राम देसपांडेगिरी खुद पुणाची व कर्यातीं मावळची काबीज मुतसरूफ असतां बाजद फितून मुलुक बदस्त सीवाजी राजे भोसले रयती बैरान पेरोशानी परागंदा मुलुक वैरान बेचिराख सबब पातशाही फौजा दौड एऊन मुलुक ताराज
(पुढें एक बंद गहाळ)