Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ४३.

श्रीरोहिडमल.
श्री.

''करीना बाबाजी कोंढालकर यास चांदजी कोंढालकर यानें भुतें लाऊन घर बुडविलें. गुणाजी कोंढालकर दसरियाचा घट उठविला, ते दिवसी मुखवटा व रुमाल भगताने श्री यांस वाईला होता. तो गुणाजी घेऊन जाऊ लागला. त्यावर चांदजी बोलिला की, गुणाजी पा। हा रुमाल माझे तरवास बांधावयास देणे. गुणाजी बोलिला कीं, चांदजी हा देवाचा रुमाल देवास असों दे, तुलाहि देत नाहीं, मीहि घेत नाहीं, आल्या दसरियास देवाचा देवास पांघरून. ह्मणून गुणाजी बोलिला. त्यावर गुणाजीची व चांदजीची बोली जाली, ह्मणऊन कटकटले. तेच दिवसी गुणाजी घरास गेला. घरीं गेल्यावर त्याला हींव येऊन डोई दुखूं लागली, ह्मणून बाळोजी देवास अंगारियास आला. देवास प्रसाद लाविले. देवानें प्रसाद दिले कीं, चांदजीनें देव व भुतें पेंसली. ह्मणून बाळोजी चांदजीस ह्मणूं लागला कीं, तूं माझ्या बाला अंगारा दे. तो अंगारा देईना. मग च्यार दिवसांनीं गुणाजी मेला. त्यावर मूळमाती घ्यावयास श्रीजननीजवळ नेला. तेथें बाळोजी चांदजीस बोलिला कीं, तूं रगताचा टिळा लाविलास. चांदजी सारे गांवकरियादेखत बोलिला कीं, मी टिळा लाविला. अझून काय झाले ? त्यावर गुरें वासरें कितीक मेले. बैल मेले, मी कोठें गेलों नाहीं. त्या देवास पुढें तो ह्मणें कीं, माझी लाग मीच मारितों. त्यास माझे लेक दो. थोरला लेक भुतांनीं मारिला. धाकला लेक याचे डोळे गेले. आंधळा जाला. याउपर सन खमस खमसैनात एकच ह्मस दोन महिने चारापाणी खाईना. देवास पुसे. तो ह्मणे माझी लाग. त्यावर चापजीस ह्मणे की तू माझी ह्मस वाचव. तो काही आंगारा नेदी. मग मी श्रीराजजाईस गेलो. तेथे मनास आणील. तिनें सांगितले की, चापजीने तुजवर देव भुतें घालून, तुझे घर व तुझा बाप लेक मारिला हे खरे; तू त्याच्या गला पड. ह्मणऊन गावास आलो. श्रीराणजाईचा भगत राणोजी गोलाहि आणीला. देवळी पाच जण भले लोक मेलऊन राणोजी गोली याने श्री रोहिडमलास प्रसाद लाविले. त्याणेहि प्रसाद दिले की, चापजीने भुते लाऊन याचे घर मारिले हे खरे. तो हुबर घालू लागला की, माझी भुते नव्हत. त्यावर राणो चापजीस बोलिला की, तूहि भगत आहेस. तूच आपले हते प्रसाद लाव. आणि देवास पूस, हे खरे की काय ? मग चापजीने आपल्या हाते प्रसाद लाविले. मी भुते लाऊन बालोजीचे घर बुडविले हे खरे की काय ? देवाने प्रसाद दिला की, चापजी तूच भुते लाऊन बालोजीचे घर बुडविले हे खरे. ऐसे पउतालियानेंसी सांगितले. मग चापाजी बोलिले की बरे, तुझे अंगी कलंक लागिले, आतां ते ह्मस पाय पसरून मरते. तिला निकालसपण अंगारा लाव. ते उठली ह्मणजे हे खरे. नाही तर देव भगत सांगतात हे अगदी लटके. त्यास चापाजीने त्याचे ह्मसीस अंगारा लाविला. दोन महिने ह्मस पडली होती ते उठोन गुरांत जाऊन चरू लागली. मग पाचांना साक्ष आली की चापजीने भुते लाविली हे खरे. मग पाच जण बोलिले की बालोजी चापजीची भुते खरी परंतु तू आमचे ऐक. याची डगडग करू नको. यास दिवाणांत नेलीयाने तुझा बाप लेक उठेनात. मागे जाले ते जाले. आता पुढं तुझे माणूस अगर गुरूं काबड याच्या भुताने मारिले ह्मणजे गोताचा खोआ दिवाणाचा गुन्हेगार ह्मणून बोलोन, याचे अंगी पाचाचे साक्षी न सिकले येणे प्रमाणे लाविली.''

मूल मारिला कलम १                       गुणाजी कोंढालकर भूते लाऊन
गुर व बैल मारिले कलम १                मारिला कलम १

ऐसी देव व खेलोजी व कालकाई व चेडे २ ऐसी भुते लाऊन माझे घर बुडविले. यासी साक्षी ऐणेप्रमाणे

सूर्याजी खोपडे व साबाजी                    तुलाजी काटे चा।
खोपडे देशमुख                                  विचित्रगड
ता। उत्रोली                                      तान्हाजी कंक चाकर किले
एसजी प॥ कुसले मौजे करजी             विचित्रगड
                                                     तुकोजी जाधव किले
येसजी लोकरा                                  विचित्रगड
माहार मौजे पानवाहल                       सटवाजी माडरा च॥
१ खंडा बिन धाकनाक                        विचित्रगड १
१ सिवनाक बिन धाका
------