Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३३.
श्री.
१६२५ माघ वद्य ६
'' पत्र वेतन मा। सुलतानराऊ बिन सुभानराऊ सिलिंबकर पदाती पंचसहश्री सुहुरसन अर्बा मया अलफ. मा।निले उमेदवार होते. स्वामिकार्याचे देखोन राजश्री पंचसचिव यांणी किले प्रचंडगडचे मुकामी हशमाची पंचहजारी सांगितली. यांस वेतन सालीन देखील चाकर.
होन पा।
५००
एकूण पांच से होन पा। रास
एणेप्रमाणे पांचशे होन पा। सरंजामी केली असे. इ॥ छ मजकुरापासून वजावांटाव दंडकप्रमाणें वजा करून उरले वेतन पावेल. चाकर मोईनप्रमाणे हजीर होतील तेरिखे पासून चाकराचा हक पावेल. जमान संभाजी गायकवाड देशमुख ता। बीरबाडी यांस घेतले असे पा। हुजूर.''
तेरीख १९ सौवाल
सौवाल बार सुरू सूद बार
लेखांक ३४.
श्री.
१६२९ मार्गशीर्ष वद्य १.
''राजश्री विष्णु विश्वनाथ हवालदार व कारकून वर्तमान
व भावी प्रांत गुंजनमावल गोसावी यांसि :-
॥ε सेवक शामजी हरी नामजाद व कारकून सुभा प्रांत मावल ता। राजगड नमस्कार सु॥ सन समान मया अलफ बा। स॥ राजश्री छत्रपतीस्वामी छ ५ रमजान तेथे आज्ञा कीं प्रतापजी सिलिंबकर याचे बाप संताजीराऊ सिलींबकर हे किले राजगडी नामजाद होते. त्यास ताम्राचा वेढा राजगडास पडिला, ते समई स्वामीकार्यप्रसंगी जखम लागोन भांडणीं पडिले. त्यांचे लेक प्रतापजी सिलींबकर स्वामीची सेवा करावी ऐसी उमेद धरून सेवा करीत आहे, परंतु मलामाणसांचे चाले ऐसा एक गाव इनाम करून दिल्हा पाहिजे, ह्मणून राजश्री शंकराजी पंडित सचिव मदारुल माहाम याणी हुजूर विनंतिपत्र पाठविले. त्यावरून स्वामी प्रतापजी सिलींबकर यावरी कृपाळु होऊन यांस नूतन इनाम मौजे तांभाड ता। गुंजनमावल हा गाव कुलबाब कुलकानु दे॥ हालीपटी व पेस्तरपटी खेरीज हकदार व इनामदार करून देह इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे. तरी तुह्मीं मौजे मा।र पूर्व मर्यादेप्रमाणे याच्या दुमाला करून इनाम यासीं व याचे पुत्र पाद्यैत्रादि वंशपरंपरेने चालवणे. साल दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. या सनदेची तालिक लेहून घेऊन असल सनद भोगवटीयास परतोन देणे. ह्मणून आज्ञा. तरी तुह्मी मौजे सदरहू प्रमाणे इनाम चालवणे प्रतिवर्शी ताजे सनदेचा उजूर न करणे. या सनदेची तालिक लेहून असल सनद भोगवटीयास प्रतोन मा। नुलेजवळ देणे जाणिजे. छ १४ रमजान मोर्तब सुद.''