लेखांक २१.
श्री.
१६१२ आश्विन शुध्द १४
नकल
'' .॥ε म॥ अनाम राजश्री हवालदार व कारकून हाल व इस्तकबाल ता। गुंजनखोरे ॥गो खंडेराऊ पानसंबाल सु॥ इहिदे तिसैन अलफ. आज तीस वर्षे आपल्या राज्यांत मोगलाची धामधूम होत आहे, यामुळे मुलुक वैराण जाले. साल गु॥ किले रायगड मोगलास कबज जाला यामुळे मुलकांत मोगलाई अमल चालिला. हाली श्रीकृपेने आपल्या राज्यांत मामला थाटत चालिला. ऐसियास देशमुख व देसकुलकर्णी व हेजिब खासनीस मुतालिक मोकदम चौगुले व बाजे वतनदार हुजूर येऊन अर्ज केला की, आपण वतनदार राजश्री साहेब पायापासीं एकनिष्ठ आहो. राजश्री कैलासवासी स्वामीचे वेळेस आपली वतने आमानत करून हकाची मोईन करून देत होते. सांप्रत गनीमाचे घामघुम करितां व मुकामे करिता रयत गेली मेली ! जुजबी राहिली, त्यास खावयासी व रहावयासी नाही. येजातीचा रयतीचा विचार जाला आहे. रयतीचा बहुतवजा दिलासा करून, किर्दी माहमुरी करून साहेबाचे या किलियासी व कामास मदती करावी लागते; तरी साहेबी आह्मा वतनदारावरी कृपाळु होऊन आमची वतने व इनामती इसाफती हकलाजिमा इनामती सेते आमचे हवाली केले पाहिजे ह्मणौन अर्ज केला. तो साहेबी हकिकती मनास आणून पाहतां, वतनदाराची वतने दुमाळी केलिया विरहित पोट तिडिक लागत नाही ऐसे कळो आले. यावरून देशमुख व देशकुलकर्णी व मुतालिक खासनीस हेजिब मोकदम चौगुले बाजे वतनदार याची वतने इनामती व इसाफती व हकलाजिमा व सेत सेरिया व हकलाजिमा यांची यांचे दुमाला केली असेत. तरी तुह्मी सदरहूप्रमाणे वर्तणुक करणे. तालिक लिहून घेणे आणि असल फिराऊन देणे. छ १२ मोहरम. प॥ हुजूर मोर्तब असे. सुरुसुद.''