लेखांक २०.
श्री.
१६१२ वैशाख शुध्द ८
''अखंडित लक्ष्मी अळंकृत राजमान्य राजश्री हैबतराऊ सिळंबकर देशमुख तो। गुंजनमावळ यांसि रामचंद्र नीलकंठ आसिरवाद सु॥ तिसैन्न अलफ. आह्मी स्वारी करून वाईंस आलों. वाईंचा कोट रगडून घेतला. प्रतापगड आदिकरून किले हस्तगत केले. याउपरी मावळांचा मामला सुरळित होउनु होउनु देशाची मामुरी व्होवी व तुह्मां लोकांची गोमटी करावी हे गोष्टी मनीं धरून, राजश्री माहादाजी सामराज यांस सुभा ते प्रांतीचा सांगोन पाठविले आहेत. यांस देशाचे लावणी संचणीविशंई सांगितले आहे व तुह्मां लोकांच्या चालवण्याविशई सांगितले आहे. तरी तुह्मीं मनिलेचे भेटीस येणे. देशास कौल बोल हे देतील त्याप्रमाणे देशाची मामुरी करणे. कदीम सेवेचे लोक आहेत ते कुल जमाव म॥ निले यांजवळी पाठऊन देणे. त्याखेरीज तुह्मीं नवा जमाव करून सुभेदार मा।निलेजवळी राहणे. पोख्तीया जमांवें स्वारी सिकारी करून जे गढ गनिमाने घेतले आहेत ते फिराऊन हस्तगत करणे. गनिमाची ठाणी जागां जागां असतील ते कूल मारून काढणे. पूर्वीपासून जसे या राज्याचे ठाईं पोटागी धरीत होतेस त्याप्रमाणे च हालींहि वर्तनुक करणे. तुमचा हक्क लाजिमा इनामती येबाबें सुभेदार मा।निलेस आज्ञा केली आहे. हे जेणेप्रमाणे तह करून देतील त्याप्रमाणे हुजूरूनहि चालऊन. तरी कोण्हेविशई अनमान न करिता तुमचा हांते स्वामीकार्य होउनु तुमचा मजुरा होये ते गोष्टी करणे. छ ६ साबान. सुरु सुद बार.''