लेखांक २२.
श्री.
१६२२ चैत्र शुध्द ८
'' राजश्री देशमुख व देशकुलकर्णी ता। गुंजणमावळ गोसावि यांसि :-
॥ ε अखंडित लक्षुमी अलंकृत राजमान्य स्त्रे॥ राघो शंकर हवालदार व कारकून ता। म॥ आशिर्वाद अनुक्रमे नमस्कार सु॥ मया व अलफ ब॥ सनद सुभा मावळ ता। राजगड सनद छ २५ रजब पैवस्त छ ६ साबान. तेथे आज्ञा की, संताजीराऊ सिलिंबकर देशमुख ता। मा। याणीं स्वामिसंनिध विनंति केली की आपले भाऊ सुभानजीराऊ सिलिंबकर हे किले पुरंधरीचे धारेस भांडणीं पडिले, त्याचे अस्त्री व मुले लाहाण आहेत. त्यांचा योगक्षेम चालावयासी काही अवकात नाही. तरी साहेबी मेहेरबान होऊन मुलालेंकरास वंशपरंपरेने अन्न दिल्हे पाहिजे ह्मणौन. त्यावरून मनास आणितां सुभानजीराऊ सिलिंबकर स्वामिकार्यावरी पडिले. याचे मुलालेकराचे चालविलियाने पुढेहि स्वामिकार्यावरी माणूस मन वाढवील; याकरिता याजवरी स्वामी कृपाळू होऊन सुभानजी सिलिंबकर याचे स्त्री मुलास नूतन इनाम मौजे सोनवडी ता। गुंजण मावळ या गावपैकी वरकस जमीन कास खंडी रास १ एक कलबाब कुलकानू खेरीज हकदार करून दिल्हे असे. तरी पूर्वील धारियाप्रमाणे जमीन पड पैकी कास खंडी १ एक रास याचे दुमाले करून इनाम यासि व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. साल दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे ह्मणौन आज्ञा. आज्ञेप्रमाणे मौजे सोनवडी ता। मा। एथे पड जमीन कास खंडी १ एक सरस निरस ठिकान थल
खंडी १ देविले असे. तरी याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवणे. नूतर पत्राचा आक्षेप न करणे. असल सनदेची तालिक लेहोन घेऊन असल परतोन भोगवटियासि देणे. जाणिजे. र॥ छ ६ माहे सौवाल मोर्तब सुद.''