लेखांक ७१.

श्री.
'' राजश्री बावाजी जुंझारराऊ देशमुख ता। कानदखोरे गोसावि यासी :-

॥ ε अखंडित-लक्ष्मी-आलंकृत-राजमान्य श्नो सुर्याजी भोसले हवालदार व कारकून किले सुधागड रामराम व आसिर्वाद सु॥ सलास खमसैन मया अलफ तुह्मी पत्र पाठविले ते पावले. लिहिले वर्तमान कळले. मौजे पाबे येथील पाटील रेणुसे याजकडील भुते आह्माकडे पडोन, नाष जाला आहे. इकडील थले उतरली आहेत. याचा विचार करावा लागतो. तरी श्रीस प्रसाद लाऊन, काये उतर येते ते लेहून पाठवावे ह्मणोन लिहिले. त्यावरून श्रीस प्रसाद लाविला. श्रीनें रेणुसा याकडील भुते खरी आहेत, ह्मणून प्रसाद दिल्हा. बहुत काय लिहिणे, लोभ असो दीजे. रा। छ १ साबान हे विनंती.''

लेखांक ७२.

श्री.

''आज्ञापत्र राजश्री पंतसचिव ता। मोकदम मौजे पाबे ता। कानदखोरें सु॥ सलास खमसैन मया अलफ. मौजे मारीं रान देखमुखानीं पेशजीपासून राखीले आहे, ते तुह्मी गावकरी रान तोडितां ह्मणून हुजूर वर्तमान विदित जाले; तरी याउपरी रान न तोडणें. कड्याखाली रान जे तोडिले असेल, तरी ते न जालवणे. देशमुख सांगतील त्याप्रमाणे वर्तणुक करणे. उजूर केलिया मुलाहिजा होणार नाही. ऐसे पष्ट समजोन वर्तणुक करणें. जाणिजे. छ १३ जमादिलाखर पा। हुजूर.''
सुरुसुद